शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीचा महिला DYSPना फटका; FBवरून व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 10:46 IST

हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनी मुंबईच्या रिक्षाचालकांचा उद्दामपणा फेसबुकवर सांगितला आहे.

मुंबई- रिक्षाचालकांचा उद्दामपणा, मनमानी कारभार सर्वसामान्य मुंबईकर नेहमीच अनुभवतात. ऑफिसला जाताना-येताना नेहमीच रिक्षाचालकांच्या वागणुकीला सामोरं जावं लागतं. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच हिंगोलीच्या डीवायएसपींनाही याचा अनुभव आला आहे. हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनी मुंबईच्या रिक्षाचालकांचा उद्दामपणा फेसबुकवर सांगितला आहे. मुंबईतील अंधेरी स्थानकावर आपण पोलीस असल्याची ओळख त्यांनी दाखवली नाही. त्यामुळे मुजोर रिक्षाचालक प्रवाशांसोबत कसे वागतात, याचा अनुभव त्यांना आला.

महिला प्रवाशांचा अपमान पोलिसांकडूनही कसा केला जातो, याची प्रचिती सुजाता पाटील यांना आली. समोर पोलीस बसलेले असतानाही रिक्षाचालक कसे वागतात त्याचा अनुभव आल्याचं सुजाता पाटील यांनी सांगितलं. ओळख न सांगता पोलीस महिलांची मदत करतात का ते पाहायचं होतं, पण पोलिसांनी मदतीऐवजी अपमान केला. महिला कधी सुरक्षित होतील, असा प्रश्न सुजाता पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून उपस्थित केला.

 फेसबुक पोस्टमध्ये सुजाता पाटील यांनी म्हंटलं आहे की, ''आज २४ march 2018.....सकाळी 15 तास प्रवास करुन भोपाळ ते मुंबई गाठली, पंजाब मेल ३ तास लेट होती. खुप थकले होते. पाय़ fracture . मुलगी आजारी जीव कासावीस झाला होता. लंगडत लंगडत बॅगा ओढत सकाळी १० वा अंधेरी गाठली. अंधेरीत(प)  नेहमीच रिक्षावाले प्रवाशाना छळवणुक करतात. नेहमीप्रमाणे रिक्षावाले भाडे नकार. कोणाला काही देणंघेण नाही. समोर पोलीस शिपाई १०० फूट खुर्चीत बसुन,  हा सगळा उतमात पोलीसांसमोर सुरू.  मी माझी ओळख सांगायची नाही ठरवलंच होतं.  पोलीस चौकीत पोलीस मदत मागता पोलीस शिपाई धनवडे व शिर्के डि.एन.नगर पोलीस. आरामात बसुन. ईशारा केला पण पोलीस सांगतो येणार नाही.  बॅगा ओढत चौकीत जावुन रिक्षावाले भाडे नाकारत आहेत सांगता , ऑन duty वरील पोलीस शिपाई दोघानी १० मिनीटे उनमत बोलुन माझा भरभरुन  अपमान केला. मला क्षणभर काहीच कळेना.  एका प्रवाशी महिलेचा अपमान कशाप्रकारे केला जावू  शकतो आज अनुभव घेतला. डोळे पानावले. अजूनही समजत नाही.  महिला कधी सुरक्षीत होतील . .हा होता माझा आजचाएका प्रवासी महिलैचा कटु अनुभव. जयहिंद. .''

रिक्षाचालकांची तक्रार पोलिसाकडे करायला गेले, त्यावेळी पोलीस उद्दामपणे बोलत होते, नाव विचारल्यावर, तुला नाव काय करायचं आहे, तू काय वाकडं करणार आहेस म्हणाले, असा प्रश्न पोलिसांनीच विचारला. मी नोकरी पणाला लावून फेसबुक पोस्ट लिहिली आहे. सरकारने मला काहीही शिक्षा दिली तरी मी तयार आहे. मला मदत मिळत नसेल, तर सर्वसामान्यांना कशी मदत मिळेल? माझं डिपार्टंमेंट सुधारावं याच हेतूने मी माझी व्यथा फेसबुकवर मांडली, अशी प्रतिक्रिया सुजाता पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. 

दरम्यान, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सुजाता पाटील यांच्याबरोबर घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Mumbaiमुंबई