शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

हिंदूंनो, किमान दहा मुले जन्माला घाला- शंकराचार्य

By admin | Updated: December 25, 2016 22:37 IST

आज हिंदुत्व धोक्यात आले आहे. हिंदू समाजापुढची आव्हाने निरंतर वाढत आहेत.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 25 - आज हिंदुत्व धोक्यात आले आहे. हिंदू समाजापुढची आव्हाने निरंतर वाढत आहेत. अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होण्याचे कारण हिंदू संघटित नाहीत. त्यांची संख्याही वेगाने कमी होत आहे. हे चित्र बदलायचे असेल तर ‘हम दो, हमारे दो’ हे सरकारी आवाहन नजरेआड करीत ‘हम दो, हमारे दस’ हे धोरण राबवा. एका हिंदू दाम्पत्याने किमान दहा अपत्य जन्माला घालणे आवश्यक आहे. त्यांचे पोेट कसे भरायचे याची चिंता करू नका, त्यासाठी परमेश्वर समर्थ आहे, असे जाहीर आवाहन ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी धर्मसंस्कृती महाकुंभाच्या धर्मपीठावरून केले. विश्व मांगल्याच्या विचारासह शहरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित तीन दिवसीय धर्मसंस्कृती महाकुंभाच्या रविवारी झालेल्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया, विद्यारण्य भारती, नरेंद्रनाथ महाराज, आचार्य जितेंद्रनाथ महाराज, साई चांडूरामसाहेबजी महाराज, साई युधिष्टिरलालजी महाराज, साई संतोष महाराज, जगद्गुरू स्वामी रामानंदाचार्य रामराजेश्वर माऊली महाराज, बाबुसिंग महाराज, जनार्दन स्वामी महाराज, दादामहाराज घोलप, संतोषनाथ ढोली महाराज, महामंडलेश्वर श्रीकृष्णभारती स्वामी महाराज, कृष्णदास नामदास महाराज,शिर्डी साई संस्थांनचे अध्यक्ष हावरे यांच्यासह हजारो संत उपस्थित होते. याप्रसंगी सर्व संतांचे धर्मसंस्कृती महाकुंभ समितीचे निमंत्रक जितेंद्रनाथ महाराज यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. या महाकुंभाच्या समारोपाप्रसंगी १११८ संतांच्या उपस्थितीतीत देशरक्षा, संस्कृतीरक्षेचा संकल्प करण्यात आला.