शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाला हिंदू जनजागृती समितीचा ‘खो’

By admin | Updated: July 23, 2015 16:24 IST

करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध केल्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आलेच नाहीत

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध केल्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आलेच नाहीत. मात्र, मूर्तीवरील धार्मिक विधी थांबविणे शक्य नसल्याने ते सुरुच ठेवण्याचा निर्णय श्रीपूजकांनी घेतल्यामुळे, हा मुद्दा संवेदनशील बनला आहे. या प्रकारामुळे मंदिर परिसरात चिंतेचे वातावरणपसरले आहे. तब्बल २२ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीचे धार्मिक विधी बुधवारी सकाळपासून सुरू झाले. मात्र, हिंदू जनजागृती समितीने विरोध केल्यामुळे व विषय धार्मिकदृट्या संवेदनशील असल्याने आम्ही ही प्रक्रिया करण्यासाठी येऊ शकत नसल्याचे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता श्रीपूजक मंडळाला दूरध्वनीवरून कळवले. हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांनी पाठविलेल्या या पत्रामुळे केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मुख्य अधिकाऱ्यांनी रासायनिक संवर्धनासाठी कोल्हापुरात येणारे अधिकारी एम. के. सिंग यांच्यासह सर्व सहकाऱ्यांना दूरध्वनीवरून या प्रक्रियेसाठी कोल्हापूरला सध्या तरी जाऊ नका, असा आदेश दिला आहे. ही माहिती पुरातत्वच्या अधिकाऱ्यांनी करवीरनिवासिनी हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना संध्याकाळी सांगितली. त्यानंतर श्रीपूजक मंडळातर्फे अजित ठाणेकर, गजानन मुनीश्वर व माधव मुनीश्वर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, वैकल्पिक वाद निवारण केंद्रात झालेल्या तडजोडीत न्यायालयाने अंबाबाई मूर्तीवर ३० आॅगस्टपूर्वी रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जावी, असा आदेश दिला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रासायनिक संवर्धन ही प्रक्रिया अधार्मिक असती तर छत्रपती, शंकराचार्य, धर्माचार्य, शास्त्री, पंडित त्यात सहभागी झाले नसते. विरोध करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना आम्ही वारंवार चर्चेसाठी आवाहन केले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. आता धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे, हे कार्य देवीच पार पाडेल. (प्रतिनिधी)अंबाबाईची मूर्ती हा सर्वांसाठीच श्रद्धेचा विषय आहे. त्याचे गांभीर्य समजून घेत मूर्तीवरील प्रक्रियेला विरोधच होता कामा नये. आता धार्मिक विधी सुरू झाल्याने विषय थांबविता येणार नाही. उद्याच पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी आणि श्रीपूजकांशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढला जाईल.- अमित सैनी, जिल्हाधिकारी मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेला विरोध होणे हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे आमच्या वरिष्ठांनी कोल्हापूरला जाणे थांबवा, असे सांगितले आहे. एम. के. सिंग, अधिकारी, पुरातत्व खातेनवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी : नाझरेहिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पुरातत्व खात्याला विरोधाचे पत्र पाठविले आहे. पत्रात म्हटले आहे की, ‘अंबाबाईच्या मूर्तीवर १९५५ मध्ये वज्रलेप झाला आहे. त्यानंतरही मूर्तीची सातत्याने झीज झाली शिवाय मूर्ती भंग पावली आहे. तिच्यावर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली तर मूर्तीमधील सत्त्व तेज लुप्त होईल. त्यामुळे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया करू नये. सध्या असलेल्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात यावी.’ भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे हा विषय पुढे मार्गी लागला होता. त्यामुळे या सर्व प्रकाराची माहिती त्यांना मेलद्वारे पाठवून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही श्रीपूजकांनी सांगितले.