मुंबई : काँग्रेस आमदारांची घोषणाबाजी, भाजपा सरकारच्या निषेधाचे नारे आणि सभात्याग अशा प्रचंड गदारोळातच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी अभिभाषण केले. स्वच्छ, गतिमान आणि विकासाभिमूख प्रशासन देण्यास राज्य सरकार कटीबध्द असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव संमत केला. त्यानंतर सायंकाळी विधिमंडळाच्या सभागृहास राज्यपालांनी संबोधित केले. महाराष्ट्रातील नवीन सरकार विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध राहील, असे सांगतानाच राज्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार असल्याचे राज्यपाल म्हणाले.
शंभर दिवसात ‘आपले सरकार’ या नावाने नवीन संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप सुरू होईल. त्याच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारी आणि सूचना ऐकल्या जातील, असे राज्यपाल म्हणाले.
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे तसेच इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येईल. दलित अत्याचार रोखण्यासाठी सरकार कठोर धोरण अवलंबणार असून या खटल्यांचा तातडीने निकाल लागावा, यासाठी राज्य सरकार प्रय}शील राहणार आहे.
सहकारी बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी येत्या दोन महिन्यात नवीन धोरण मांडण्यात येणार असून सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
एलबीटी रद्द करण्यासोबतच उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी जाचक अटी रद्द करण्यात येणार असल्याचे राज्यपाल म्हणाले. (प्रतिनिधी)
शिवसेना
आमदार संभ्रमात
एकीकडे काँग्रेस सदस्यांनी सरकारविरोधात रुद्रावतार धारण केले असतानाच शिवसेना आमदार मात्र संपूर्ण भाषणादरम्यान संभ्रमावस्थेत आढळून आले. काँग्रेस आमदारांशेजारीच बसलेले शिवसेना आमदार संपूर्ण वेळ शांत बसून होते.
‘राव’गिरी नही चलेगी
राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान काँग्रेस आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. सुरुवातीला ‘दादागिरी नहीं चलेगी’, ‘अल्पमतातील सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा आमदार देत होते. मात्र, दादा म्हणजे अजितदादा का, असा खोचक सवाल भाजपा आमदारांनी करताच ‘राव’गिरी नहीं चलेगीचा आवाज काँग्रेस सदस्यांमधून येवू लागला. सुमारे अर्धा तासांच्या घोषणाबाजीनंतर काँग्रेस आमदारांनी सभात्याग केला.
राज्यपालांच्या
भाषणातील प्रमुख मुद्दे
च्शंभर दिवसात ‘आपले सरकार’ नावाचे संकेतस्थळ आणि
मोबाईल अॅप.
च्राज्यात 24 तास वीज व पाणी.
च्राज्यांतील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी ‘महामार्ग व एक्स्प्रेस वे’ची बांधणी.
च्सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन. ऊस तोडणी कामगारांच्या हितासाठी विशेष प्रय}
च्पोलीस दलाचे आधुनिकीकरण. महिलांच्या संरक्षणासाठी विशेष ‘वुमन सेल’. पोलीस दल पुनर्बाधणीसाठी प्रयत्न.
च्नव्या रोजगार निर्मितीवर भर देणार.
च्नवी पर्यायी व्यवस्था आणल्यानंतर एलबीटी रद्द करणार.
च्पिकांसाठी विशेष योजना. वनविकासासाठी पडीक जमिनीचा वापर करणार. धान्य साठवण्यासाठी अधिकाधिक गोदामांची योजना.
च्मुंबई-गोवा चौपदरी मार्गाचे काम लवकर पूर्ण करणार. राष्ट्रीय महामार्गाचा विकास करणार.
च्येत्या पाच वर्षात राज्यात स्मार्ट
सिटी उभारणार.
च्तापी खो:याच्या पुनर्भरणासाठी संशोधन. राज्याच्या जलसंधारण कामांना प्रोत्साहन देणार. ठिबक सिंजन योजनेला प्राधान्य देणार.