शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

चेरापुंजी नव्हे, पाथरपुंजमध्ये सर्वाधिक पाऊस; देशात पहिल्या पाचमध्ये साताऱ्यातील ४ ठिकाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 06:07 IST

नवजा आणि महाबळेश्वर ही सर्वाधिक पावसाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात.

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नवजा आणि महाबळेश्वर ही सर्वाधिक पावसाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. मात्र, यंदा त्यात बदल झाला आहे. एवढेच नव्हे तर देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या चेरापुंजीपेक्षाही जादा पाऊस पडल्याची नोंद जिल्ह्यातील चार ठिकाणी झाली आहे. त्यामध्ये पाटण तालुक्यातील पाथरपुंज हे सर्वाधिक पावसाची नोंद झालेले ठिकाण बनले आहे. येथे जून ते आॅगस्टदरम्यान ७ हजार ३५९ मिलीमीटर पाऊस झाला आहे तर चेरापुंजीत ५,९३८.४ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

वाई तालुक्यातील बलकवडी धरणाच्या वरील बाजूस असणारे जोर येथे ६ हजार ९८९ मिलीमीटर, पाटण तालुक्यातील नवजा येथे ६ हजार २७२ मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथील वालवण येथे ६ हजार ८४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे ६ हजार ४४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कुठे आहे पाथरपुंज?कोयनानगरच्या नैऋेत्येला पाटण तालुक्यात पाथरपुंज हे गाव आहे. भैरवनाथ गडापासून तिकडे जाता येते. हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. विश्ोष म्हणजे गाव सातारा जिल्ह्यात असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली गेली आहेत. येथे पडणाºया प्रचंड पावसाचे पाणी मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची सीमारेषा ठरलेल्या वारणा नदीच्या पात्रात जाते. या नदीचा उगमही याच गावच्या पश्चिमेला आहे.

वाशिमला सर्वांत कमी पाऊसयंदा विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी गडचिरोलीत सर्वाधिक म्हणजे १२४७.४७ मिमी पाऊस पडला. मात्र पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी अवघा ३७५.३ मिमी पाऊस पडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये जानेवारीपासूनच पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.पाटण तालुक्यातील पाथरपुंज या गावात नेहमी मोठा पाऊस होतो. यंदाही या ठिकाणी विक्रमी पाऊस झाला आहे. मात्र, हे पाणी कोयना धरणात जमा होत नाही.- संजय डोईफोडे, अधीक्षक अभियंता, कोयना धरण विभाग

टॅग्स :Rainपाऊस