शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

मोदींच्या ‘क्लास’साठी शाळांची धावपळ

By admin | Updated: September 5, 2014 01:14 IST

शिक्षकदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावे, असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये टीव्ही, संगणक,

कुठे ‘आॅल इज वेल’ तर कुठे जमवाजमव : विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतानागपूर : शिक्षकदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावे, असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये टीव्ही, संगणक, प्रोजेक्टर यासारख्या गोष्टी अगोदरपासूनच उपलब्ध होत्या, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करून ठेवली आहे. परंतु साहित्य नसलेल्या शाळांनी सरकारी आदेशाचे पालन करण्यासाठी इकडून तिकडून साहित्य जमा करण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता.सुमारे १०० दिवसांपूर्वी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी शिक्षकदिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पावणेदोन तास ते देशभरातील सर्वच शाळकरी विद्यार्थ्यांशी संपर्क साधणार आहेत. पंतप्रधानांचा संदेश विद्यार्थ्यांना पाहता यावा यासाठी सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना दुपारी २.३० ते ४.४५ पाच या वेळेत एकत्रित जमवून कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश शिक्षण उपसंचालकांकडून शाळांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अनेक विनाअनुदानित शाळांमध्ये टीव्ही संच, संगणक यांची व्यवस्था नाही. अनेक शाळांत प्रक्षेपणाच्या मूलभूत सुविधा नाहीत. शिवाय अनेक ठिकाणी भारनियमन तसेच जागेचादेखील प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना एका ठिकाणी जमा करण्याइतकी जागा अनेक शाळांत उपलब्ध नाही. तरीदेखील शाळांनी आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत. काही ठिकाणी शिक्षकांनी इकडून तिकडून साहित्याची जमवाजमव केल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.सर्व तयारी पूर्ण, शाळा सज्ज नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण दाखविण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी आम्ही केली आहे. शिक्षकदिनाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना एकत्रितपणे बसून भाषण ऐकता यावे यासाठी टीव्ही, केबल तसेच स्पीकरवगैरे सर्वच गोष्टी उपलब्ध आहेत, असे आर.एस. मुंडले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा चांगदे यांनी सांगितले.शासन निर्देशाच पालन होणारचपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्याच्या शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. टीव्ही, रेडिओ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाषण दाखविण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच एक चांगली संधी राहणार आहे.- मधुसूदन मुडे, मुख्याध्यापक, मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतनहायटेक तयारीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशासाठी शाळेतर्फे ‘हायटेक’ तयारी करण्यात आली आहे. एलसीडी, प्रोजेक्टर व संगणक यांचा यासाठी उपयोग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनीच या गोष्टी ‘आॅपरेट’ करण्यासाठी विचारणा केली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे व त्यांच्यात उत्साहदेखील दिसून येत आहे.- विनय निमगावकर, मुख्याध्यापक, जामदार शाळारेडिओद्वारे ऐकणार भाषणआमच्या शाळेत एकाच ठिकाणी मुलांना बसवणे थोडे अवघड जाईल. त्यामुळे टीव्ही किंवा प्रोजेक्टरच्या साह्याने त्यांना भाषण दाखवणे अडचणीचे ठरेल. परंतु वर्गखोल्यांमध्ये स्पीकरची व्यवस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘एफएम’ रेडिओच्या माध्यमातून वर्गखोल्यांतच हा संदेश ऐकविल्या जाईल. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमध्येदेखील उत्साह आहे.- विजय शाहाकार, मुख्याध्यापक, गजानन हायस्कूलप्राथमिकपेक्षा माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना रसनरेंद्र मोदी यांच्या भाषणासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. मुलांनादेखील याची सूचना देण्यात आली आहे. एलसीडी, स्पीकर या वस्तू शाळेत उपलब्ध आहेतच. विद्यार्थ्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे भाषण ऐकण्यात किती रस आहे व त्यांना ते किती समजेल, याबाबत साशंकता आहे. परंतु माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्तांमधील सर्वच विद्यार्थी हे भाषण ऐकतील.- पल्लवी दाढे, मुख्याध्यापिका, सेंट झेव्हिअर्स स्कूलइंटरनेटवरून दाखविणार भाषणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. आमच्या शाळेत प्रोजेक्टरची व्यवस्था आहे, शिवाय एकाच ठिकाणी विद्यार्थी बसू शकतील अशी सोयदेखील आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून प्रोजेक्टरच्या मदतीने स्क्रीनवर विद्यार्थ्यांना भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येईल.- स्नेहल रोकडे, मुख्याध्यापिका, साईनाथ विद्या मंदिरधावपळ झाली, तयारी पूर्णनरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकवावे यासंदर्भात आदेश आल्यानंतर आम्ही तयारीला सुरुवात केली. शाळेत टीव्ही, एलसीडी, स्क्रीनवगैरे उपलब्ध होते. परंतु थेट प्रक्षेपणासाठी ‘डीटीएच’ केबल सुविधा नव्हती, शिवाय या सर्व साहित्याचे ‘टेस्टिंग’ करणेदेखील आवश्यक होते. यात थोडी धावपळ नक्की झाली. परंतु आता तयारी पूर्ण झाली आहे.- विनीता बावर, मुख्याध्यापिका, न्यू अ‍ॅपॉस्टॉलिक स्कूल