शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन वर्षांतील उच्चांक, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुंबईत भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 04:08 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घसरत असताना मुंबईकरांना मात्र पेट्रोल व डिझेल दरवाढीचा सामना करावा लागत आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घसरत असताना मुंबईकरांना मात्र पेट्रोल व डिझेल दरवाढीचा सामना करावा लागत आहे. पेट्रोलच्या दरांनी १ आॅगस्ट २०१४ नंतर प्रथमच प्रति लीटरसाठी ८० रुपयांचा आकडा ओलांडला आहे. तर आतापर्यंत डिझेलचे सर्वाधिक दर हे ३१ आॅगस्ट २०१४ साली ६७.२६ इतके होते. मात्र सोमवारी प्रति लीटर डिझेलसाठी वाहनचालकांना ६७.१० रुपये मोजावे लागले.आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकीत सिंह यांनी सरकारला इंधनांच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने ही मोठ्या संख्येने डिझेलवर चालतात. त्यामुळे डिझेलच्या दरात वाढ झाल्यास वाहतूक खर्च वाढतो. परिणामी उत्पादकांना दरवाढ करावी लागते. त्याचा भार ग्राहकांना सहन करावा लागतो. सरकारने उत्पादन शुल्कात सातत्याने वाढ केल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी असताना सरकारने त्याचा फायदा ग्राहकांना द्यायला हवा. याउलट सरकार महसुलात वाढ करण्यासाठी वेगवेगळे दर आकारत असल्याचे सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल