शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षांच्या निकालारुन उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठावर ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 12:31 IST

मुंबई विद्यापीठाला विविध परीक्षांचे निकाल जाहीर करायला विलंब झाल्याने राजकीय वातावरण तापलेले असताना आता कोर्टाने याप्रकरणी विद्यापीठावर ताशेरे ओढले आहेत.

ठळक मुद्देऑगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठातील तब्बल सव्वाचार लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आतापर्यंत विद्यापीठाला केवळ १० टक्केच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात यश आले आहे.

मुंबई, दि. 3 - मुंबई विद्यापीठाला विविध परीक्षांचे निकाल जाहीर करायला विलंब झाल्याने राजकीय वातावरण तापलेले असताना आता कोर्टाने याप्रकरणी विद्यापीठावर ताशेरे ओढले आहेत. ऑनलाइन मुल्यांकनासाठी तुम्ही आवश्यक साहित्य वेळेवर का उपलब्ध करुन दिले नाही असा सवाल कोर्टाने विद्यापीठाला विचारला आहे तसेच दोन आठडयांच्याआत विद्यापीठाकडून उत्तर मागितले आहे. ऑगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठातील तब्बल सव्वाचार लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. 

आतापर्यंत विद्यापीठाला केवळ १० टक्केच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात यश आले आहे. त्यामुळे पुढच्या ३ दिवसांत ९० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याचे आव्हान विद्यापीठासमोर आहे. तरीही विद्यापीठाचा उत्तरपत्रिका तपासणीचा वेग संथच असल्याने दिवसागणिक विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढत आहे. बुधवार, २ ऑगस्टला सायंकाळपर्यंत फक्त साडेचौदा हजार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. निकालाची डेडलाइन चुकल्यामुळे सव्वाचार लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या डेडलाइनप्रमाणे ९० टक्के निकाल तीन दिवसांत जाहीर होणार का? अथवा, कुलगुरूंनी सांगितल्यानुसार पुढच्या १३ दिवसांत ९० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करून विद्यापीठ चमत्कार घडवणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

२५५ निकाल बाकी-मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुंबई विद्यापीठाने १७३ निकाल जाहीर केले होते. बुधवारी विद्यापीठाने ४९ निकाल जाहीर केले आहेत. आतापर्यंत विद्यापीठाने २२२ निकाल जाहीर केले असून, अजूनही २५५ निकाल जाहीर करायचेआहेत.मुंबई विद्यापीठाचे निकालाचे काम पूर्ण झाले नसल्याने, बुधवारीही विद्यार्थी संघटनांनी नारेबाजी करत, कलिना कॅम्पसमध्ये आंदोलने केली. बुधवारी मुंबई काँग्रेसतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात, कुलगुरू डॉ. संजय देशमुख, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रवींद्र वायकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.अग्रवाल, कीर्ती, सिद्धार्थ, सी.एच.एम. कॉलेजमध्ये विद्यार्थी भारतीने, ‘कुलगुरू चले जाव’ आंदोलन केले. प्रहार विद्यार्थी संघटनेने कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कुलसचिव डॉ. एम. ए. खान आदींचे मोबाइल क्रमांक, सोशल नेटवर्किंगवर टाकून त्यांना फोन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.

विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्प डेस्क’-मुंबई विद्यापीठाच्या निकालांना उशीर झाल्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश झालेले नाहीत. परदेशात अथवा अन्य राज्यांत अभ्यासक्रमासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना निकाल मिळालेला नाही. त्यांना मदत करण्यासाठी विद्यापीठाने ‘हेल्प डेस्क’ सुरू केला आहे.विद्यापीठातर्फे स्थापन करण्यात आलेल्या या कक्षातर्फे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सोपे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना बाहेर प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ यांच्या नावाने लेखी अर्ज करावा, असे विद्यापीठातर्फे आवाहन करण्यात आले आहे.विद्यार्थी ज्या परदेशी अथवा अन्य भारतीय विद्यापीठात वा संस्थेत प्रवेश घेणार आहेत, त्याचे निमंत्रण पत्र किंवा प्रवेश मिळत असल्याचे पत्र व तसे सूचित करणाºया पत्राची छायाप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. हेल्प डेस्क सुरू केल्यावर २५ विद्यार्थ्यांनी अर्ज पाठविले. यापैकी ५ विद्यार्थ्यांचे निकाल परदेशातील विद्यापीठात पाठवण्यात आले असून ३ निकाल देशातील विद्यापीठांना पाठवण्यात आल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.