शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित मनोधैर्य योजनेवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, बलात्कार व अ‍ॅसिडहल्ला पीडितांसाठीची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:09 IST

बलात्कार व अ‍ॅसिडहल्ला प्रकरणातील पीडितांना प्रस्तावित सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या सुधारित योजनेवर शिक्कामोर्तब करीत एक महिन्यात ही योजना अधिसूचित करण्याचा आदेश सरकारला दिला आहे.

मुंबई : बलात्कार व अ‍ॅसिडहल्ला प्रकरणातील पीडितांना प्रस्तावित सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या सुधारित योजनेवर शिक्कामोर्तब करीत एक महिन्यात ही योजना अधिसूचित करण्याचा आदेश सरकारला दिला आहे.बलात्कार व अ‍ॅसिडहल्ला प्रकरणातील पीडितांसाठी आॅक्टोबर २०१३मध्ये मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली. मात्र या मूळ योजनेत पीडितांसाठी नुकसानभरपाई म्हणून त्रोटक रक्कम मंजूर करून सरकारने त्यांची परवडच केली. या योजनेला आव्हान देणाºया अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. तर काही पीडितांनी ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली. या सर्व याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.नव्या व सुधारित मनोधैर्य योजनेसाठी सरकारने खूप वेळ खर्च केला आहे. प्रस्तावित सुधारित योजनेबाबत आम्ही समाधानी आहोत, असे म्हणत न्यायालयाने सुधारित मनोधैर्य योजनेवर शिक्कामोर्तब केले. एका महिन्यात सुधारित योजना अधिसूचित करण्याचे निर्देशही राज्य सरकारला या वेळी दिले.सरकारने ही प्रस्तावित सुधारित मनोधैर्य योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयानेही सरकारची ही विनंती मान्य केली. त्रुटीविरहित आणि आदर्शवत मनोधैर्य योजना तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाने काहीच दिवसांपूर्वी दोन विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्ती केली होती. त्यात महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव व याचिकाकर्त्या एनजीओचा समावेश होता. या समितीने दोनच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात १६ पानांचा अहवाल सादर केला. या अहवालातील शिफारशी सरकारने मान्य केल्याची माहिती महाअधिवक्त्यांनी उच्च न्यायालयाला दिली....तर रक्कम परत घेणारप्रस्तावित सुधारित मनोधैर्य योजनेनुसार, बलात्कारानंतर एखाद्या महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या वारसदारांना १० लाख रुपये नुकसानभरपाई मिळेल. तसेच बलात्कार किंवा अ‍ॅसिडहल्ल्यामुळे एखाद्या महिलेला कायमचे मानसिक किंवा शारीरिक अधुत्व आल्यास तिलाही १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येईल. घटना घडल्यानंतर संबंधित महिलेला तत्काळ ३० हजार रुपयांची मदत करण्यात येईल. मात्र संबंधित महिलेने खटल्यात साक्ष फिरवल्यास तिला देण्यात आलेली नुकसानभरपाईची रक्कम तिच्याकडून परत घेण्यात येईल.

टॅग्स :Courtन्यायालय