शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ बोर्डाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाला हायकोर्टाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 04:59 IST

निवडणूक पारदर्शकपणे झाली नसल्यास याचिकाकर्ते ‘निवडणूक याचिका’ दाखल करू शकतील, अशी मुभा खंडपीठाने दिली.

औरंगाबाद : महाराष्टÑ वक्फ बोर्डाच्या ‘मुतवल्ली संवर्गातील’ पुरुष आणि महिला अशा दोन सदस्यांच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची विनंती करणाऱ्या ‘जनहित याचिके त’ हस्तक्षेपाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. ए.जी. घारोटे यांनी शुक्रवारी नकार दिला. याप्रकरणी अल्पसंख्याक विभागाचे मुख्य सचिव, निवडणूक अधिकारी आणि वक्फ बोर्डाचे सीईओ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.सदर निवडणूक पारदर्शकपणे झाली नसल्यास याचिकाकर्ते ‘निवडणूक याचिका’ दाखल करू शकतील, अशी मुभा खंडपीठाने दिली. पुणे येथील महाराष्टÑ वक्फ लिबरेशन अ‍ॅण्ड प्रोटेक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष सलीमुल्ला आणि निवृत्त मुख्य आयकर आयुक्त ए.जी. खान (पुणे) यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या निवडणुकीला स्थगिती मागणारी जनहित याचिका त्यांनी दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचे असे म्हणणे होते की, संपूर्ण महाराष्टÑात अंदाजे २५ हजार नोंदणीकृत वक्फ मालमत्ता आहेत, ज्यावर मुतवल्ली आणि कार्यकारी नियुक्त आहेत. ज्या संस्थांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये आहे त्या वक्फ संस्थांचे मुतवल्लीच या निवडणुकीत मतदार होण्यासाठी पात्र समजले जातात. अशा फक्त १३४ मतदारांची यादी तयार करून सदर निवडणूक घेण्यात येणार होती. मागील निवडणुकीत या मतदारसंघात ८५० मतदार होते. यावर्षी मात्र पात्र उमेदवारांना डावलून केवळ १३४ मतदारच मतदान करणार होते. सदर निवडणूक वक्फ कायद्याचा भंग करून घेण्यात येणार होती, म्हणून जनहित याचिका दाखल करीत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.