शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ निर्णय नोटाबंदीसारखाच, आॅनलाइन पेपर तपासणीवरून उच्च न्यायालयाने फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाचा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय ‘नोटाबंदी’च्या निर्णयाप्रमाणे आहे, असा टोला उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला लगावत, दोन आठवड्यांत याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.सुविधा न पुरविता सुरू केलेल्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धतीला प्राध्यापक संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे.गुरुवारच्या सुनावणीत न्या. भूषण गवई व ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाचा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय ‘नोटाबंदी’च्या निर्णयाप्रमाणे आहे, असा टोला उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला लगावत, दोन आठवड्यांत याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.सुविधा न पुरविता सुरू केलेल्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धतीला प्राध्यापक संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे.गुरुवारच्या सुनावणीत न्या. भूषण गवई व न्या. रियाझ छागला यांनी विद्यापीठाला याबाबत विचारले असता, विद्यापीठाच्या वकिलांनी पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धत सुरू केल्याने गोंधळ उडाल्याचे म्हटले. उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणी करायची होती, तर त्यापूर्वी सर्व तयारी करायला हवी होती,’ असे खंडपीठाने म्हटले.‘तुमचा हा निर्णय ‘नोटाबंदी’ प्रमाणे आहे,’ असा टोला विद्यापीठाला लगावत, विद्यापीठाने संघटनेच्या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.संघटनेच्या याचिकेनुसार प्रतिवादींनी (मुंबई विद्यापीठ आणि अन्य) आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत राबविताना संगणक, इंटरनेट यांसारख्या सुविधाच पुरविल्या नाहीत. त्यामुळे परीक्षांच्या निकालासाठी विलंब झाला.‘मुंबई विद्यापीठाने फेब्रुवारीमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, विधि व अभियांत्रिक शाखांच्या आॅनलाइन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एप्रिलमध्ये एका कंपनीला हे सॉफ्टवेअर बनविण्याचे कंत्राट दिले; परंतु मेअखेरपर्यंत संबंधित कंपनीने काम पूर्ण केले नाही. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम उशिराने सुरू झाले. विद्यापीठाने महाविद्यालयांनाच संगणक उपलब्ध करण्यास जबरदस्ती केली. मात्र, हे सर्व संगणक अद्ययावत नसल्याने प्राध्यापकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे,’ असे संघटनेने याचिकेत म्हटले आहे.