शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पोलीस आधुनिकीकरण कारवाईबद्दल शपथपत्र दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 01:38 IST

चार आठवड्यांची मुदत : कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासह अन्य मागण्यांवर याचिका

खुशालचंद बाहेती औरंगाबाद : पोलीस आधुनिकीकरणासंबंधी दाखल जनहित याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्यांवर राज्य शासनाने ४ आठवड्यांत शपथपत्र दाखल करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांनी या विषयावर आदेश देऊनही अद्याप उत्तर का सादर केले नाही, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने केली आहे.

पोलीस दलातील लोकांची संख्या वाढवावी, कामाची वेळ ८ तास करावी. यासह अन्य मागण्या करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात गेल्या वर्षी दखल करण्यात आली होती. पोलिसांना ८ तासांच्या कामाचे नियोजन करण्यामागे त्यांच्यावरील व्यावसायिक ताण कमी करून मानसिक आरोग्य राखणे असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

याच्या पुष्ठ्यर्थ अनेक अभ्यास अहवालांचे हवाले देण्यात आले आहेत. साप्ताहिक सुटी न मिळता अनेक तास कराव्या लागणाºया कामामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होतो व त्याचा बळी जातो, असा निष्कर्ष या अहवालात असल्याचा दावा करण्यात आला आहे. ८ तासांची ड्यूटी हा प्रयोग केरळमध्ये यशस्वी झाला असून, महाराष्ट्रात तो लागू करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती या जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

पद्मनाभय्या समितीने २००० साली पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी पोलीस दलात जास्तीत जास्त पोलीस उपनिरीक्षकांची भरती करावी, अशी शिफारस केली असतानाही राज्याने २०१७-१८ मध्ये एकाही पोलीस उपनिरीक्षकाची नेमणूक झाली नाही, असा दावा करण्यात आला आहे.

प्रभारी मुख्य न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी आणि न्या. एन.आर. बोरकर यांनी या मुद्यावर चार आठवड्यांत शपथपत्र दाखल करण्याचा आदेश शासनास दिला आहे.जनहित याचिकेतील मुद्दे1)राज्यात प्रतिलक्ष जनसंख्येच्या प्रमाणात १४५ पोलिसांची पदे आहेत. संयुक्त राष्ट्रांची किमान २२५ ची शिफारस आहे.2)राज्यात मंजूर असलेल्या २,४१,८१३ पदांपैकी २,१३,३८२ पदे भरण्यात आली असून, ३० हजार पदे रिकामी आहेत.3)भारतीय पोलीस सेवेच्या ३१७ मंजूर पदांपैकी फक्त २५५ पदे भरलेली आहेत.4)राज्य व केंद्राने २०१८-१९ सालात आधुनिकीकरणासाठी मंजूर केलेल्या ९१.३५ कोटी निधीपैकी फक्त ९ कोटी खर्च करण्यात आले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय