शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 19:31 IST

डॉ. संतोष ठाकरे यांची याचिका : निवडणुकीसाठी अन्य आस्थापनेतून कर्मचारी नियुक्तीचे आदेश

अमरावती : मूर्तिजापूर येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष ठाकरे यांनी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची ड्युटी निवडणुकीसाठी लावल्याच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यानंतर नागपूर उच्च न्यायालयानेभारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. यामध्ये महाविद्यालयातील कर्मचाºयांव्यतिरिक्त अन्य आस्थापनेतून कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत तसेच डॉ. ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन निवडणुकीसाठी कर्मचारी सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण राज्यभरात हा विषय सध्या चर्चेत आला आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी २०१९ च्या परीक्षांसाठी आपले वेळापत्रक जाहीर केले असून, एप्रिलपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे. यामध्ये काही परीक्षा ३१ मे पर्यंत चालणार आहेत. परीक्षा काळात महाविद्यालयातील कर्मचारी आणि प्राध्यापकांवर अगोदरच कामाचा मोठ्या प्रमाणावर ताण असतो. अशा स्थितीत कर्मचाºयांना बाहेर जावे लागल्यास त्याचा थेट परिणाम परीक्षेसोबतच विद्यार्थ्यांच्या भविष्यावरदेखील होतो. त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष ठाकरे यांनी विद्यार्थिहित लक्षात घेता ही याचिका हायकोर्टात दाखल केली होती.

डॉ. ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगासोबतच अकोल्याचे जिल्हाधिकारी आणि मूर्तिजापूरच्या एसडीओंना यासंबंधी नोटीस जारी केली. यामध्ये हे प्रकरण तातडीने निकाली काढण्यासोबतच निवडणुकीसाठी दुसºया आस्थापनेतून कर्मचारी नियुक्त करण्याचेदेखील आदेश दिले आहेत. एकीकडे प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या मोठ्या प्रमाणावर नियुक्ती निवडणुकीच्या कामासाठी केल्या गेल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालय आणि  विद्यापीठांच्या परीक्षांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे डॉ. ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे महाविद्यालयीन कर्मचाºयांना यातून दिलासा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सहा दिवस महाविद्यालय बंद ठेवणे शक्य नाहीनिवडणुकीसाठी होणारे प्रशिक्षण आणि अन्य दिवस लक्षात घेता कर्मचाऱ्यांना एकूण सहा दिवस व्यस्त राहावे लागते. परंतु, परीक्षा आणि महाविद्यालयीन कामांना मात्र एवढे दिवस सुट्टी नसल्याने मी महाविद्यालय एवढे दिवस बंद ठेवू शकत नाही, असे डॉ. संतोष ठाकरे यांनी अकोला येथील जिल्हाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सांगितले. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची ड्युटी नाकारून महाविद्यालयीन कामकाजाचे महत्त्व लक्षात आणून देणारे संतोष ठाकरे हे पहिलेच प्राचार्य ठरले आहेत. राज्यात अशी घटनादेखील पहिल्यांदाच घडली आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगHigh Courtउच्च न्यायालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक