शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गावित यांच्या चौकशीतील दिरंगाईवरून हायकोर्टाने झापले

By admin | Updated: November 17, 2014 04:00 IST

अभय ओक व न्या. अनिल गडकरी यांच्या खंडपीठाने सुनावले. आधी सांगितल्यानुसार गेल्या आठवड्यात अहवाल दिला नाही तेव्हा न्यायालयाने हे बोल सुनावले.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रीपदावरून काढल्यानंतर आता भाजपाचे आमदार झालेले डॉ. विजयकुमार गोवित व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेविषयी केलेल्या खुल्या चौकशीचा अहवाल देण्यात दिरंगाई केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास (एसीबी)ला झापले.तुम्ही चौकशीला विलंब का लावत आहात? आधी तुम्ही छुपी चौकशी केलीत. त्याला बराच वेळ लावलात. आता खुल्या चौकशीला तुम्ही त्याहूनही अधिक वेळ लावत आहात, असे न्या. अभय ओक व न्या. अनिल गडकरी यांच्या खंडपीठाने सुनावले. आधी सांगितल्यानुसार गेल्या आठवड्यात अहवाल दिला नाही तेव्हा न्यायालयाने हे बोल सुनावले.एका चौकशीचा अहवाल याआधी दिलेला आहे. दुसराही लवकरच दिला जाईल, असे सरकारी वकील समीर पाटील म्हणाले. त्याने समाधान न झाल्याने न्यायाधीश म्हणाले, आधीचा अहवाल आॅगस्टमध्ये दिलात. नंतरचा अहवाल अद्याप दिलेला नाही. सद्यस्थितीदर्शक अहवाल आम्हाला २४ नोव्हेंबरला द्या.बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गावित आणि कुटुंबियांवर खटला भरावा यासाठी व्ही. आर. मुसळे यांनी केलेल्या रिट याचिकेच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आहे.गावित आणि त्यांच्या कुटुंबियांवरील बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांत सकृद्दर्शनी तथ्य आढळले असल्याचे ‘एसीबी’ने आधीच्या सुनावणीत न्यायालयास सांगितले होते. आधी केलेल्या छुप्या चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने गावित यांच्याविरुद्ध खुली चौकशी करण्याचा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे ५ मार्च रोजी पाठविला असल्याचेही ‘एसीबी’ने सांगितले होते.गावित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या २००७-०८ च्या प्राप्तीकर व मालमत्ता करआकारणीचे प्रकरण पुन्हा खोलण्यात आले असल्याचे प्राप्तिकर विभागाने कळविले होते.राज्य सरकारने खुल्या चौकशीस परवानगी दिल्यानंतर न्यायालयाने गावित यांना आरोप केल्याप्रमाणे रोखीने मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणले याचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र करण्यास सांगितले होते. (प्रतिनिधी)