शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी हायटेक वाचनालय

By admin | Updated: January 7, 2017 01:58 IST

इंटरनेट आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे माहिती मिळविणे ही आता कठीण गोष्ट नाही.

मुंबई : इंटरनेट आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे माहिती मिळविणे ही आता कठीण गोष्ट नाही. जगात कुठल्याही कोपऱ्यात बसून एका क्लिकवर सर्व माहिती सहज उपलब्ध होते. पण, सामान्य व्यक्तींना ही सहज सोपी वाटणारी बाब दृष्टिहीन व्यक्तींसाठी मात्र तितकीच अवघड असते. इंटरनेट वापरण्यास त्यांना अनेक अडचणी येतात. दृष्टिहीन व्यक्तींना माहिती शोधणे सोपे व्हावे म्हणून आयआयटी पवईतर्फे एक अद्ययावत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईचे संचालक देवांग खखर यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. दृष्टिहीन विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात. त्यांना अभ्यासाची आवड असते, ते शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट करतात. पण, अनेकदा या विद्यार्थ्यांना अभ्यासाची संदर्भ पुस्तके, संशोधन सहज उपलब्ध होत नाही. कारण, पुस्तके हे विद्यार्थी वाचू शकत नाहीत. याचा विचार करून दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी खास अ‍ॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात आली आहेत. याआधारे विद्यार्थ्यांना माहिती, पुस्तके सहज उपलब्ध होणार आहे. या वाचनालयात अत्याधुनिक स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. प्लेक्सटॉक पॉकेट डेसी आहे. हा छोटा प्लेअर आणि रेकॉर्डर आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास मदत होणार आहे. ‘संगीता’ सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण, या सॉफ्टवेअरमुळे लेखी स्वरूपातील माहिती एमपी ३ प्लेअरमध्ये कनर्व्हट होते. कुठेही नेऊ शकतो असा स्कॅनर आणि रिडर आहे. अत्याधुनिक ब्रेलर या वाचनालयात उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टींचा नक्कीच दृष्टिहीन विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. भविष्यात दृष्टिहीन विद्यार्थ्यांना यापेक्षा आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येतील. अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, येथे प्रवेश घ्यावा, अशी आमची इच्छा असल्याचे खखर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)