शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

इथे केला आर्ची-परशाने संसार....

By admin | Updated: May 17, 2016 15:04 IST

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या सैराट चित्रपटातील ‘आर्ची - परशा’चा संसार ज्या हैद्राबादमधील झोपडपट्टीमध्ये सुरु होतो; ती झोपडपट्टी हैद्राबादमधील नसून पुण्याच्या मध्यवस्तीतील ‘जनता वसाहत’ आहे.

- लक्ष्मण मोरे
(फोटो - दत्तप्रसाद शिंदे)
 
पुणे, दि. १७ - संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या सैराट चित्रपटातील ‘आर्ची - परशा’चा संसार ज्या हैद्राबादमधील झोपडपट्टीमध्ये सुरु होतो; ती झोपडपट्टी हैद्राबादमधील नसून पुण्याच्या मध्यवस्तीतील ‘जनता वसाहत’ येथील आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धात दाखवण्यात आलेली आक्काची दोन्ही घरे, सार्वजनिक शौचालय, घरच्यांची आठवण आल्यामुळे आर्चीने जिथून फोन केला तो पीसी... हे सर्व काही पुण्यातील 'जनता वसाहत' येथे चित्रीत झाले. या साध्या ‘लोकेशन्स’ वापरुन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कष्टक-यांच्या वस्त्यांची अवस्थाही समाजासमोर आणली आहे. 
पर्वती पायथ्यापासून ते हिंगण्यापर्यंत विस्तारलेल्या जनता वसाहतीमध्ये 'आर्ची परशाचे' घर शोधणे म्हणजे फारच अवघड काम होते. वसाहतीमधील पोलीस चौकीपासून थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांच्या खोलीच्या दिशेने टेकडीवर चढायला सुरुवात करावी लागते. अरुंद गल्ली बोळांमधून चढून गेल्यानंतर अगदी वरच्या बाजुला वाघजाई मंदिर लागते. या मंदिराच्या उजव्या हाताला काही झोपड्या आहेत. झोपडपट्टीचे हे आकाशाला भिडलेले शेवटचे टोक आहे. तेथेच लक्ष्मी रमाकांत लांडगे यांची खोली आहे. लक्ष्मी या पत्नी रमाकांत, मुलगी ऐश्वर्या, अंतरा आणि मुलगा आदित्य यांच्यासह राहण्यास आहेत. 
 

या खोलीमध्ये आर्ची परशाच्या संसाराचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रपटामधली सामानाच्या अडगळीने भरलेली खोली आजही तशाच अवस्थेत आहे. परशा गळफास घेण्याचा प्रयत्न करतो तो लाकडी वासा, मोरी, स्वयंपाकाचा ओटा सर्व काही जसेच्या तसे चित्रपटात वापरण्यात आलेले आहे. चित्रीकरणासाठी केवळ एक छोटासा बदल खोलीमध्ये करण्यात आला होता. सध्या खोलीच्या उजव्या बाजुला दरवाजा आहे तो बंद करुन डाव्या बाजुला दरवाजा पाडण्यात आला होता. तेथे आर्चीला बसण्यासाठी एक छोटासा ओटाही बांधण्यात आला होता. चित्रीकरण संपल्यानंतर हा दरवाजा पुन्हा बंद करण्यात आला. 
तर चित्रपटात आर्ची परशाला गुंडांपासून वाचवून त्यांना राहण्यासाठी घर देणारी ‘आक्का’ ज्या घरात राहत असते; ते घर नजमा फारुख सय्यद यांचे आहे. त्यांचे पती फारुख अहमद सय्यद बिगारी काम करतात. त्यांची मुलगी नुजरहां ही शाहु महाविद्यालयात बारावीमध्ये शिकते आहे. तर मुलगा अनिस 9 वी मध्ये आहे.
 
जेव्हा या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी घर देणार का अशी विचारणा करण्यात आली तेव्हा सुरुवातीला सर्वांनी नकार दिला होता. मात्र, या सर्वांचे मन वळवण्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना यश आले. सय्यद यांच्या लहान मुलाला ‘आक्का’च्या मुलाची भुमिकाही मंजुळे यांनी देऊ केली. या मुलाने चित्रपटात आक्काच्या लहान मुलाची भुमिका केली आहे. 
ज्या खाटेवर बसून आर्ची टीव्ही बघत असते; ती खाट आणि टीव्ही आजही आहे त्याच स्थितीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. किंबहुना चित्रपटामध्ये त्यांची जागा न बदलताच चित्रीकरण क रण्यात आलेले आहे. 
 
चित्रीकरणादरम्यानचे काही किस्से :
>  चित्रपटाचे शूटिंग करतत असताना नागरिकांना चित्रपटाचे नाव मात्र सांगण्यात आलेले नव्हते. चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतर लांडगे आणि शेख यांना घरभाडे म्हणून समाधानकारक रक्कम देण्यात आली. या दोन्ही कुटुंबांनी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहिला. पत्र्याच्या साध्या झोपड्या असल्या तरी या कष्टक-यांना त्या महालासारख्याच आहेत. कष्टाने उभ्या केलेल्या झोपड्या चित्रपटात पाहताना खूप आनंद झाल्याचे या दोन्ही कुटुंबांनी सांगितले. 
 
> घरांच्या या  ‘लोकेशन्स’ पासूनच काही अंतरावर आदर्श मित्र मंडळ आहे. या मंडळासमोरील बोळातून वरच्या दिशेने चढून गेल्यावर एक सार्वजनिक शौचालय आहे. या सार्वजनिक शौचालयाच्या भोवतीनं असलेला कचरा, घाण आणि लोखंडी पुलाची अवस्था आजही तशीच कायम आहे.चित्रीकरणादरम्यान ‘साबणाच्या जाहिराती’चे शुटींग सुरु असल्याचे सांगण्यात आल्याचे  शौचालयाचे केअरटेकर कसबे यांना सांगण्यात आले होते. 
 
इथे चित्रीत झाला 'सैराट'चा चटका लावणारा शेवट...
ऑनरकिलींगचे भीषण वास्तव दाखवणारा 'सैराट'चा शेवट ज्या खोलीत झाला, जिथे आर्ची परशाचा खून झाला ती खोली आहे वारज्यातील चिदानंद प्रतिष्ठाणशेजारील ‘चंद्रकांत चौधरी’ चाळीमध्ये... चंद्रकांत चौधरी आणि नागराज मंजुळे मित्र आहेत. मंजुळे यांना चाळीबद्दल माहिती होती. या खोलीत चार - पाच दिवस चित्रीकरण करण्यात आले. सध्या ही खोली पाहण्यासाठी तरुण येत आहेत. खोलीसमोर स्वत:चे सेल्फी काढले जात आहेत. जनता वसाहत आणि वारज्यामध्ये एप्रिल - मे 2015 या कालावधीत चित्रीकरण करण्यात आले होते.
 
 
 
 
 
 

 
 
जगप्रसिद्ध 'फोर्ब्स' मासिकानेही 'सैराट'ची दखल घेतली आहे. बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करणा-या 'सैराट' चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑनर किलिंगसारख्या महत्वाच्या विषयावर भाष्य करुन चित्रपटाने सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं असताना जगप्रसिद्ध मासिक ‘फोर्ब्स’ने देखील 'सैराट' चित्रपटाची दखल घेतली आहे. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला सैराट चित्रपटाने तीन आठवड्यांत ५५ कोटींची कमाई करत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. मराठीमध्ये सर्वात जास्त कमाई करणार चित्रपट ठरला आहे.