शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

९१ टक्के गुण मिळूनही तिच्यावर आई-वडील नाराज

By admin | Updated: June 14, 2017 19:45 IST

दहावीचा निकाल लागला आणि तिने आॅनलाइन गुण पाहिले... ९१ टक्के गुण तिला मिळाले... तिने आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे होता; पण

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 14 -  दहावीचा निकाल लागला आणि तिने आॅनलाइन गुण पाहिले... ९१ टक्के गुण तिला मिळाले... तिने आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे होता; पण तिने स्वत:ला घराच्या खोलीत कोंडून घेतले. कारण, तिच्या आई-वडिलांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळावेत, अशी अपेक्षा होती; पण तिने ती पूर्ण केली नाही. आता माझे आई-बाबा मला खूप बोलतील. शाब्दिक छळ करतील, पदोपदी अपमान करतील. आता पुढील जगणे मुश्कील होईल, या भीतीने त्या मुलीने स्वत:ला कोंडून घेतले. गारखेडा परिसरातील तपस्या (नाव बदलले आहे.) ही मुलगी अभ्यासात हुशार. तिचे आई-वडील दोघेही इंजिनिअर. त्यांना आपल्या मुलीने दहावीच्या परीक्षेत कमीत कमी ९५ टक्के गुण मिळावेत, अशी अपेक्षा होती. आपली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते तपस्यावर सतत दबाव आणत होते. तिने अभ्यासातच लक्ष घालावे, यासाठी तिला सतत बोलत होते. तपस्या मैत्रिणीसोबत थोडा वेळ फिरायला गेली की, मैत्रिणीसमोर तिचा अपमान करीत, नातेवाईकांसमोर पदोपदी अपमानही करीत होते. हा मानसिक छळ व अपेक्षांचा तिच्यावर ताण आला होता. निकालाच्या आदल्या दिवशी तिची आई तिला म्हणाली होती की, काय परीक्षेत बोंब पाडते कोणास ठाऊक... कमी गुण मिळाले, तर आई-वडील काय बोलतील, या भीतीने तिला रात्रभर झोप आलीच नाही... आज सकाळपासून तिने जेवणही केले नाही. दुपारी आॅनलाइन निकाल जाहीर झाला. तिला ९१ टक्के गुण मिळाले. त्याचवेळी वडिलांचा आॅफिसमधून आईच्या मोबाइलवर मेसेज आला ह्यमला माहीतच होते ही समाजात आपले नाक कापणार आणि तसेच झाले.ह्ण आईने हा मेसेज तपस्याला वाचून दाखविला. ९१ टक्के गुण मिळविल्याच्या आनंदाऐवजी घरात मातम सुरू झाला. वडिलांच्या भीतीने तपस्याने स्वत:ला घरातील एका खोलीत कोंडून घेतले. तिच्या आईने मानसोपचारतज्ज्ञांना फोन लावला व म्हणाली की, ९१ टक्के म्हणजे काय मार्क आहेत का, आमच्या मुलीने आमचे नाक कापले, तिच्यासाठी आम्ही वर्षभर अनेक गोष्टींचा त्याग केला. तिच्यासाठी मी नोकरी सोडून माझे करिअर पणाला लावले.तिला आवडते ते वेळेवर खाऊ घातले; पण अखेर आमची भीती खरी ठरली... आता बारावीत काय बोंब पाडते कोणास ठाऊक... आता खोली बंद करून तोंड लपवून बसली, असे म्हणत आईने फोन ठेवून दिला. डॉक्टरांनी तपस्याचा वडिलांना फोन लावला व परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. अति अपेक्षा करू नका, परीक्षेतील गुणांपेक्षा मुलगी महत्त्वाची आहे, असे समजावून सांगितले. वडिलांनी आॅफिस सुटल्यावर दुकानातून पेढे घेऊन सरळ घर गाठले व मुलीला खोलीबाहेर बोलावून तिच्या तोंडात पेढ्याचा घास भरविला. झाले, गेले विसरून जा, आपण हॉटेलमध्ये जाऊन आनंद साजरा करू असे म्हटल्यावर तपस्याचा जीव भांड्यात पडला.गुण महत्त्वाचे की, पाल्य?मानसोपचारतज्ज्ञांनी प्रश्न केला की, पालकांना परीक्षेतील गुण महत्त्वाचे आहेत की, आपला पाल्य, हे आधी निश्चित करावे. ९१ टक्के मार्क घेऊनही तुम्ही मुलीचा मानसिक छळ करीत असाल, तर त्यास काय म्हणावे. अशा वागण्यामुळे पाल्यांचे मानसिक खच्चीकरण होते. हे पालकांच्या लक्षातच येत नाही. मुलगा असो वा मुलगी, परीक्षेप्रसंगी सर्वोत्तम पेपर सोडविण्याचा ते प्रयत्न करतात. जर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, तर पुढील परीक्षेत अधिक गुण मिळव, असे म्हणून पाल्याचे धैर्य वाढवा. कारण, आयुष्यात केवळ एकच परीक्षा नसते, अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. हे कदापि विसरू नये.