शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासाठी तिने केली नवऱ्याच्याच घरी चोरी

By admin | Updated: May 29, 2017 12:54 IST

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पुण्यातील एका महिलेने आपल्या पतीच्या घरी चोरी केल्याची माहिती समोर येते आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 29- प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पुण्यातील एका महिलेने आपल्या पतीच्या घरी चोरी केल्याची माहिती समोर येते आहे. रूपाली जनार्दन निंबाळकर असं या महिलेचं नाव आहे. घरातील दागिने चोरी करून प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय रूपालीने घेतला होता. त्यासाठी घरातील दागिने चोरी करून तिने ते दागिने प्रियकराला दिले. पण दागिने घेऊन रूपालीचा प्रियकर फरार झाला आहे. याप्रकरणी विमान नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.   
24 मे रोजी ही घटना घडली होती. रूपाली निंबाळकर 24 तारखेच्या रात्री बॅगेतून काहीतरी घेऊन जात असल्याचं त्यांच्या पतीने पाहिलं होतं. त्यावेळी जनार्दन यांनी रूपालीचा पाठलाग केला पण अंधार असल्यामुळे रूपाली कोणाला भेटते आहे ते समजलं नव्हतं. रूपाली घरी आल्यानंतर ती कोणाला भेटली होती हे जाणून घेण्याचा जनार्दन निंबाळकर यांनी प्रयत्न केला.
सुरूवातीला बिचकलेल्या रूपालीने पतीच्या चौकशीनंतर तीच्या प्रेमप्रकरणाची कबूली दिली असल्याची माहिती मिळते आहे. भारत सरगम नावाच्या एका व्यक्तीबरोबर आपले प्रेमसंबंध असल्याचं रूपालीने तीच्या पतीला सांगितलं. गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचंही तीने पतीसमोर कबूल केलं आहे. आम्ही दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे.
जम्मू-काश्मिरमध्ये आम्ही दोघं जाणार होतो, असंही रूपाली म्हणाली. 24 मे रोजी मी भारतला भेटली होती आणि घरातील 30 तोळं सोन्याचे दागिने भारतला दिल्याचं रूपालीने तीच्या पतीला सांगितलं. दोघांना नवी नोकरी मिळे पर्यंत दागिने विकून मिळणाऱ्या पैशांवर उदरनिर्वाह करणार असल्याची कबूली रूपालीने दिली आहे. पण दागिने मिळाल्यानंतर रूपालीच्या प्रियकराने तीच्याशी बोलणं बंद केल्याचं आणि भारत दागिने घेऊन पळून गेल्याचं रूपालीच्या लक्षात आलं.
याप्रकरणी जनार्दनने रूपाली आणि सरगमच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विमान नगर पोलिस दागिने घेऊन फरारा असलेल्या भारत सरगमचा शोध घेत आहेत.