शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

हेपॅटायटीस, टायफॉइडच्या रुग्णांत वाढ

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

पावसाळ्यानंतर दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या हेपॅटायटिस आणि टायफॉईड या आजारांचे प्रमाण यंदा पावसाळ्याआधीच वाढले आहे

मुंबई : पावसाळ्यानंतर दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या हेपॅटायटिस आणि टायफॉईड या आजारांचे प्रमाण यंदा पावसाळ्याआधीच वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पाच महिन्यांतच हेपॅटायटिसच्या रुग्णांमध्ये २५ टक्के तर टायफॉईडच्या रुग्णांमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. २०१५ मध्ये हेपॅटायटिसचे १ हजार १८४ रुग्ण आढळले होते. यंदा जानेवारी ते मे दरम्यान ६५७ रुग्ण आढळले आहेत. टायफॉईडचे गेल्यावर्षी १ हजार ३२४ रुग्ण आढळले होते. तर, यंदा आजपर्यंत ५७९ रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी लेप्टोच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली होती. त्यामुळे यंदा लेप्टोला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. प्रत्येक वॉर्डमधील प्राण्यांची व्हेटर्नरी डॉक्टरकडून तपासणी करण्याची आणि लसीकरणा मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर तबेला मालकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका सहआयुक्त आय. ए. कुंदन यांनी दिली. (प्रतिनिधी)>पावसाळ्यासाठी पालिका सज्जडासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेने धूर फवारणीला सुरुवात केली आहे. २७ वॉर्डमध्ये फवारणी सुरू आहे. झोपडपट्टी भागात अडगळीत टाकलेल्या वस्तू, टायर यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. खासगी मालकीच्या ३ हजार ६१८ पाण्याच्या साठ्यांची तर, महापालिका जागांमधील २ हजार ४०६ पाण्याच्या साठ्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोणत्याही ठिकाणी साचलेले पाणी अथवा अडगळ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सांगितले. >रुग्णालयात २ हजार २२३ खाटा राखीव पावसाळा सुरू झाल्यावर डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, हेपॅटायटिसच्या रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे २ हजार २२३ खाटा पावसाळी आजारांसाठी राखीव ठेवल्या आहेत. रुग्ण वाढल्याने महापालिका रुग्णालयांत रुग्णांना जमीनवर गादी घालून ठेवावे लागते. हे होऊ नये म्हणून आधीच खाटा राखीव ठेवल्या आहेत. त्याचबरोबर औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. >पावसाळ््यात दूषित पाणी आणि अन्न पदार्थांमुळे आजार होण्याचा धोका असतो. अन्न व औषध प्रशासनाने पाण्याचे आणि बर्फाचे नमुने यांची चाचणी सरू केली आहे. ८ नमुने घेण्यात आले आहेत. त्यांच्या चाचण्या सुरु आहेत. अहवाल आल्यावर आणखी नमुने घ्यायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल.- सुरेश अन्नपूर्णे, सहआयुक्त (अन्न) एफडीए