मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. मात्र काही लोक बातम्या पुरवून आरोपींना मदत करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.भ्रष्टाचार व राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था याबाबत विरोधी पक्षाने अंतिम आठवडा प्रस्ताव दिला होता. त्यावर बोलताना फडणवीस यांनी वरील आरोप केला. मुख्यमंत्री म्हणाले की, बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले होते. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नाजूक होती. मात्र पोलिसांनी ही परिस्थिती उत्तम हाताळली हाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली असल्याचा पुरावा आहे.
पानसरे हत्या प्रकरणात आरोपींना मदत
By admin | Updated: August 1, 2015 01:11 IST