शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साडेअकरा लाख आदिवासींना प्रत्येकी ४ हजार रु.ची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 03:50 IST

लोकमतच्या पाठपुराव्याला यश; दोन हजार रोख, दोन हजाराचे रेशन

मुंबई : आर्थिक विवंचनेतील ११ लाख ५५ हजार आदिवासींना दोन हजार रुपये रोख आणि दोन हजार रुपये किमतीचे रेशन असे चार हजार रुपयांचे खावटी अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. त्यासाठी आदिवासी विकास विभागाला ४८६ कोटी रुपये खर्च येणार आहे. लोकमतने या अनुदानासाठी सातत्याने पाठपुरावा केला.यापूर्वी आदिवासींना खावटी कर्ज दिले जायचे पण आता ते अनुदान स्वरुपात असल्याने परत करावे लागणार नाही. कोरोनाच्या संकटामुळे आदिवासी कुटुंबांना रोजगार नसल्याने या वर्षापुरतेच हे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) हे अध्यक्ष असतील तर योजनेच्या विभागीय स्तरावरील अंमलबजावणीसाठी अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास हे अध्यक्ष असतील.यापूर्वी : आदिवासींना खावटी कर्ज दिले जायचे. आता : ते अनुदान स्वरुपात असल्याने परत करावे लागणार नाही. वर्षभरासाठी असेल अनुदानआदिवासींना हे मिळणार२ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील आणि एका कुटुंबास २ हजार रुपये किमतीचे मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर, चहापत्ती असा किराणा देण्यात येईल.यांना मिळणार अनुदान: मनरेगावरील ४ लाख आदिवासी मजूर, आदिम जमातीची २ लाख २६ हजार कुटुंब, पारधी जमातीची ६४ हजार कुटुंब, घटस्फोटित, परितक्त्या, विधवा, भूमिहिन भगिनींचे ३ लाख कुटुंब तसेच वैयक्तिक वनहक्क मिळालेले १ लाख ६५ हजार कुटुंब यांना हे अनुदान देण्यात येणार आहे.