शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

राज्यात हेल्मेट सक्ती

By admin | Updated: February 4, 2016 04:28 IST

मुंबई, नागपूर आणि औरंगाबादनंतर आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : मुंबई, नागपूर आणि औरंगाबादनंतर आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे. परंतु ही सक्ती  नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिली.शहरात १ फेब्रुवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यानिमित्त बुधवारी अमरप्रीत चौकात रावते यांच्या हस्ते हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, गटनेता राजू वैद्य आदी उपस्थित होते. जीवितहानी कमी होण्यास हेल्मेटमुळे मदत होते. औरंगाबादमध्ये जनतेने त्याची सुरुवात केल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.मुंबईमध्ये हेल्मेटचा प्रयोग ९५ टक्के यशस्वी झाला आहे. यानंतर औरंगाबादमध्ये या आदेशाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. औरंगाबादमध्ये हे करणे अपरिहार्य आणि आवश्यक होते, असे रावते म्हणाले. हेल्मेट सक्तीमुळे शहरात हेल्मेटचा तुटवडा निर्माण झाल्याविषयी रावते म्हणाले, वाहन खरेदी करतानाच हेल्मेट मिळाले पाहिजे. वाहनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनीच हेल्मेटची व्यवस्था करावी, हे नियमात आणता येईल का याची चाचपणी केली जात आहे.हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे पुष्पगुच्छ देऊन परिवहनमंत्री दिवाकर रावते स्वागत करीत असताना एका महिलेने गर्दीतून वाट काढत त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. पुष्पगुच्छ देऊन काहीही फायदा नाही, आधी रस्ते खड्डेमुक्त करा, शहर बससेवा सक्षम करा आणि नंतर हेल्मेट सक्ती करा, अशी मागणी महिलेने केली. त्यावर रावते यांनी अमरप्रीत चौकातील सिग्नलवर उभ्या असलेल्या शहर बसकडे लक्ष वेधले. ‘ती पाहा, बस रिकामी जात आहे, लोक बसतच नाहीत’, असे रावते म्हणाले; परंतु त्यानंतरही महिलेने आपले म्हणणे लावून धरले.पुण्यात हेल्मेटकारवाई होणार तीव्र औरंगाबादपाठोपाठ पुण्यात हेल्मेट सक्ती लागू करणार असल्याचे, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केल्यानंतर, हेल्मेट सक्तीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात हेल्मेट सक्तीची कारवाई आणखी तीव्र्र करणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. सध्या दिवसाला साधारणपणे साडेआठशे दुचाकी चालकांवर हेल्मेटची कारवाई करण्यात येत आहे. थेट परिवहनमंत्र्यांनीच हेल्मेट सक्ती जाहीर केल्यामुळे, वाहतूक पोलिसांना बळच मिळाले आहे. हा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला असल्यामुळे त्याला सक्ती म्हणता येणार नाही. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे हा कायदा आहे, तो सर्वांनी पाळणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘सक्ती’ असा शब्दप्रयोग करणे योग्य ठरणार नसल्याचे आवाड यांनी सांगितले. वर्षाला साधारण ४०० नागरिकांचा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर अपघाती मृत्यू होतो. वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये २४० दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. यातील केवळ एकाच व्यक्तीने हेल्मेट घातलेले होते, तर २०१४ मध्ये झालेल्या अपघातांमध्ये २३९ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. यातीलही केवळ एकाच वाहनचालकाने हेल्मेट घातलेले होते. तरीही पुणेकरांनी आणि सामाजिक संस्थांनी वेळोवेळी हेल्मेट घालण्याचा नियम आंदोलनांद्वारे हाणून पाडला आहे.