शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

तिस-या दिवशीही पावसाचा जोर कायम, येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 08:35 IST

शनिवार, रविवारनंतर तिस-या दिवशी म्हणजे सोमवारीदेखील (21 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम आहे. येत्या 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, दि. 21 - शनिवार, रविवारनंतर तिस-या दिवशी म्हणजे सोमवारीदेखील (21 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम आहे. येत्या 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार परिसरातही पावसाचा जोर कायम आहे.

पावसाचा जोर कायम राहणार पुढील तीन-चार दिवस राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. सोमवारी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला.

दरम्यान, रविवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याला झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत जलधारांचा मारा कायम होता. रविवारी सुट्टीच्या दिवशी पडलेल्या या पावसाने मुंबईकरांना सुखद गारवा दिला. दुपारचा काही वेळ वगळता, सकाळसह सायंकाळी सर्वत्रच कोसळलेल्या जलधारांनी मुंबई न्हाऊन निघाली. येत्या 48 तासांत मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.

किना-यावरील गावांना सतर्कतेचा इशारासुट्टी, त्यात मेगाब्लॉक व पावसाच्या संततधारेने रविवारी ठाणे जिल्हा थंडावल्याचे चित्र होते. दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे भातसा धरणाच्या पातळीत वाढ झाली असून, रविवारी या धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे भातसा नदी किना-यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. माळशेज घाटातही संततधार पाऊस आणि दाट धुके असल्यामुळे वाहतूक मंदावली होती. भातसा नदीच्या पुरामुळे सापगावकडे जाणाऱ्या  पुलावरील वाहतूक बंद करावी लागली. कल्याणजवळील वाळकस पुलावर तीन फुटांवरून पाणी वाहत होते.

रायगडमध्ये जोर कायम

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद पेण येथे १२० मि.मी. झाली आहे. पेण तालुक्यातून गणेशमूर्ती परगावी रवाना होण्याच्या काळातच पावसाने जोर धरल्याने गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्यांची तारांबळ उडाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कामातही या पावसामुळे समस्या निर्माण होत आहेत.

पालघरला झोडपलेपालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. जव्हार, विक्रमगड, मोखाडा, पालघर, डहाणू, वाडा येथे पावसाचा जोर जास्त होता. यामुळे गणेशोत्सवापूर्वी आलेल्या शेवटच्या रविवारच्या खरेदीच्या उत्साहावर विरजण पडले.

गोदावरीला पूरनाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संध्याकाळी सहा हजार ४०० क्यूसेक इतके पाणी नदीपात्रात सोडले जात होते. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला.पावसाचे ९ बळीपावसाचे मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांत वेगवेगळ््या दुर्घटनांत आठ बळी गेले. नगरला भिंत पडून एकाचा मृत्यू झाला.महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशसह मध्य भारतात येत्या दोन आठवड्यांत चांगला पाऊस अपेक्षित आहे. पावसाचा तुटवटा भरून निघेल, अशी आशा असली, तरी काही ठिकाणी पुराचाही धोका आहे. -माधवन राजीवन, सचिव, केंद्रीय भूविज्ञान खाते