शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
2
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
3
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
4
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
5
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
6
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
7
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
8
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
9
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
10
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
11
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
12
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
13
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
14
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
15
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
16
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
17
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
18
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
19
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
20
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी, लोकल सेवा विस्कळित

By admin | Updated: June 21, 2016 10:38 IST

मुंबईसह उपनगरात पडलेल्या पावसामुळे मध्ये रल्वेच्या गाड्या अप आणि डाऊन मार्गावर १५ - १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेवरही १० मिनिट उशिराने गाड्या धावत आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ : चातकाप्रमाणे मान्सून पावसाची वाट पाहिलेल्या मुंबईकरांना पावसाने चांगलेच झोडपले. रात्रभर सुरु असलेला पाऊस मंगळवारी सकाळपर्यंत सुरु होता. पावसामुळे मुंबईची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.  मुंबईसह उपनगरात पडलेल्या पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम तिन्ही लाईनवरील सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य रल्वेच्या गाड्या अप आणि डाऊन मार्गावर १५ - १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवरही लोकल १० मिनिटं उशिराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वे लाईनवरील लोकलही अर्धा तास उशिराने धावत आहेत. 
 
मुंबईत काल पहिल्याच तडाख्यात सखल बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याने मुंबई महानगरपालिकेची नाले सफाई मोहिम तोंडावर आपटली. मंगळवारी पहाटे दक्षिण मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर अवघ्या दोन तासात मुंबई सेंट्रल नायर रूग्णालय परिसरात रस्ते पाण्याखाली गेले. आज मुंबईमध्ये सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कुलाबा, भायखळा, महालक्ष्मी, वरळी, दादर, सायन आणि कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड व वांद्रे, अंधेरी, बोरीवली आणि जोगेश्वरीत जोरदार हजेरी लावली.
 
मुंबईत गेल्या 24 तासात चांगला पाऊस झाला आहे. सोमवारपासून आज सकाळी 4 वाजेपर्यंत मुंबई शहरात 24.88 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम उपनगरांमध्ये 10.93 आणि पूर्व उपनगरात 27.37 मिलीमिटर पाऊस पडला आहे.
 
अंदाजापेक्षा जवळपास १० दिवस उशिरा मान्सून राज्यात दाखल झाला. नेहमी कोकणमार्गे येणारा मान्सून यंदा विदर्भमार्गे दाखल झाला आहे.
 
सोमवारी दिवसभरात मुंबईत २४ मिमी, पुणे ०९, जळगाव ३, महाबळेश्वर १, नाशिक ७, अलिबाग १३, पणजी ६, औरंगाबाद १, अकोला ४ मिमी पाऊस झाला आहे़ कोकणातील रोहा येथे १७७ मिमी पावसाची नोंद झाली़ तसेच मुरुड, तळा ११०, माणगाव येथे प्रत्येकी ८०, मराठवाड्यात माजलगाव, उस्मानाबाद, पाटोदा प्रत्येकी ७०, सुधागड, पाली, जामखेड, परतूर येथे ६० मिमी पावसाची नोंद झाली़ आहे.