ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 2- गरमीने हैराण झालेल्या लहान मुलांनी आज पावसात भिंजण्याचा आनंद घेतला.चार पाच दिवसांपुर्वी लोणावळा परिसरात मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावली होती. यानंतर आकाश निरभ्र झाल्याने गत दोन तिन दिवस कडक ऊन्हाने नागरिक हैराण झाले होते.
आज सकाळ पासून प्रचंडी गरमी जाणवू लागल्याने पाऊस लवकरच येईल अशी शंका नागरिक उपस्थित करत असताना दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे रस्त्यांच्या लगत पाण्याची डबकी तुंबली होती.