शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

शहर, उपनगरात पावसाची जोरदार हजेरी

By admin | Updated: August 27, 2016 01:42 IST

श्रावण महिना सुरू झाल्यापासून अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी मुंबईत जोरदार हजेरी लावली.

मुंबई : श्रावण महिना सुरू झाल्यापासून अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी मुंबईत जोरदार हजेरी लावली. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात कोसळलेल्या पावसाचे प्रमाण कमी असले तरीदेखील दक्षिण आणि मध्य मुंबईत दुपारी तब्बल तीन तास कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली. तीन तासांत शहरात १६.९४ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ४.१५ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात २.६८ मिलीमीटर पाऊस पडला. दरम्यान, ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असल्या तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.जून आणि जुलै महिन्यात तुफान बरसलेल्या पावसाचा आॅगस्ट महिन्यात जोर ओसरला. श्रावण सुरू झाल्यापासून पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा वगळता शहर आणि उपनगरात पाऊस सलग पडला नाही. विशेष म्हणजे दहीहंडीदिवशी तर शहर आणि उपनगरात दिवसभर कडाक्याचे ऊन होते. शुक्रवारी मात्र पावसाने भल्या पहाटेच मुंबईकरांनी वर्दी दिली. शहरात सकाळपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम सायंकाळपर्यंत कायम होती. महत्त्वाचे म्हणजे दुपारी २ वाजता दक्षिण आणि मध्य मुंबईवर दाटून आलेल्या ढगांमुळे पावसाने पुढचे तब्बल तीन तास आपला मारा सुरू ठेवला. कुलाबा, फोर्ट, भायखळा, लालबाग, महालक्ष्मी, वरळी आणि दादरसह लगतच्या परिसरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोसळलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. पूर्व उपनगरात सकाळी ११ वाजता दाटून आलेल्या ढगांमुळे सायन, कुर्ला, विद्याविहार आणि घाटकोपर येथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. याचवेळी पश्चिम उपनगरात मात्र पावसाचे प्रमाण कमी होते. (प्रतिनिधी)>वाहतुकीवर परिणामपावसाचा वेग कायम राहिल्याने मशीद बंदर, भायखळा, दादर येथील टिळक ब्रिज, दादर आणि माटुंगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन सर्कल, लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला डेपो, कमानी जंक्शन आणि घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा, अंधेरी ते साकीनाका मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. पावसातील पडझडीच्या घटना सुरूच असून, पूर्व उपनगरात भिंत पडल्याची घटना घडली. शहरात दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात एक आणि पश्चिम उपनगरात एक अशा दोन ठिकाणी झाडे पडली.