ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - मुंबईतील मालाड येथे बांधकाम सुरू असलेल्या ३७ मजली इमारतील लागलेली आग अखेर आटोक्यात आली असून सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मालाड परिसरातील ओमकार बिल्डर्सच्या एका इमारतीला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र इमारतीच्या उंचीमुळे त्यांच्या कार्यात अडथळे येत होते. अखेर सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आघ विझवण्यात त्यांना यश आले असले तरी तोपर्यंत आगीत इमारतीचे १७ मजले भस्मसात झाले. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने तेथील काही मजूर जखमी झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.