शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात उष्णतेची लाट; मुंबईचा पारा जाणार ३५ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 06:05 IST

हवामानात सातात्याने बदल नोंदविण्यात येत असतानाच हवामान खात्याने पुन्हा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेने तापत असतानाच आता मुंबईच्या कमाल तापमानातही चढ-उतार नोंदविण्यात येत असून, वाढता उकाडा यात भर घालत आहे. हवामानात सातात्याने बदल नोंदविण्यात येत असतानाच हवामान खात्याने पुन्हा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत. मध्यंतरी झालेल्या अवेळी पावसामुळे येथील कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली होती. मात्र आता पुन्हा हवामान कोरडे झाल्याने कमाल तापमानाने कहर केला आहे. विशेषत: मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत असतानाच राज्यात अधिकाधिक शहरांचे कमाल तापमान ३८ ते ४० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत होते.दरम्यान, मुंबईत बुधवारसह गुरुवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.राज्याचा अंदाज२४ एप्रिल : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.२५ एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.२६ ते २७ एप्रिल : विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल.मंगळवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)अकोला ४३.४, अमरावती ४२.६, औरंगाबाद ४०.२, बीड ४२.१, बुलडाणा ४०.६, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४१, जळगाव ४२.२, जेऊर ४०, मालेगाव ४२.८, मुंबई ३४.८, नागपूर ४२.५, नाशिक ४०.१, उस्मानाबाद ४०.९, परभणी ४३.२, पुणे ४०.३, सातारा ४०.१, सोलापूर ४१.३, ठाणे ४१.२, वर्धा ४३.८, यवतमाळ ४२.२.