शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बढत्यांमधील आरक्षणाची सुनावणी नव्या खंडपीठापुढे; न्या. खानविलकर, न्या. चंद्रचूड यांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:49 IST

अनुसूचित जाती, जमाती आणि विशेष मागासवर्गांना नोकºयांमध्ये आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या अपिलांच्या सुनावणीतून

विशेष प्रतिनिधी मुंबई: अनुसूचित जाती, जमाती आणि विशेष मागासवर्गांना नोकºयांमध्ये आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या अपिलांच्या सुनावणीतून न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी माघार घेतल्याने आता ही अपिले नव्या खंडपीठापुढे बुधवारी सुनावणीस येतील.सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. खानविलकर व न्या. चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे ३० आॅक्टोबर रोजी, न्यायालयाची वेळ संपता संपता या अपिलांचा घाईघाईने उल्लेख केला गेला तेव्हा, कोणताही आदेश न देता सुनावणीसाठी सोमवार १३ नोव्हेंबर ही ताराख दिली गेली होती.त्यानुसार या खंडपीठापुढे ही अपिले सोमवारी आली नाहीत. न्यायालयाच्या वेबसाइटवर संध्याकाळी संगणकाव्दारे बुधवार १५ नोव्हेंबर ही नवी तारीख दिली गेल्याचे दाखविले गेले. तसेच न्या. खानविलकर व न्या. चंद्रचूड यांचा समावेश नसलेल्या खंडपीठापुढे तीत्या दिवशी येतील, असे टिपणही वेबसाइटवर टाकले गेले. त्यामुळे नवे खंडपीठ कोणाचे असेल हे रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नाही.महाराष्ट्र सरकारने बढत्यांमधील आरक्षणासाठी सन २००४ मध्ये काढलेला ‘जीआर’ उच्च न्यायालयाने ४ आॅगस्ट रोजी घटनाबाह्य ठरवून रद्द केला होता. त्याविरुद्ध महाराष्ट्र सरकार, आॅर्गनायजेशन फॉर राइट््स आॅफ ट्रायबल्स, विमुक्त जाती, नोमॅडिक ट्राईब्ज अ‍ॅण्ड स्पेशल बॅकवर्ड क्लास एम्प्लॉईज अ‍ॅण्ड आॅफिसर्स असोसिएशन व विजय घोगरे, बापुसाहेब पवार, राजेंद्र पवार आणि शिवाजी उपासे या मूळ याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ही अपिले केली आहेत.मूळ याचिका प्रलंबित असताना सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार बढत्यांमध्ये दिल्या गेलेल्या हजारो बढत्या आत्तापर्यंत कायम आहेत. त्यांचे भवितव्य अपिलांच्या निकालांवर ठरेल. दरम्यान, राज्य शासनाने नव्या बढत्या देणे तूर्तास बंद केले आहे.

टॅग्स :reservationआरक्षणCourtन्यायालय