शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीत यंदा बिनधास्त 9 थर लावा, वयोमर्यादेची अटही 18 वरुन 14 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 15:08 IST

दहीहंडी उत्सवातील थरांची उंची तसेच लहान मुलांच्या सहभागाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महत्वपूर्ण निकाल दिला.

मुंबई, दि. 7 - दहीहंडी उत्सवातील थरांची उंची तसेच लहान मुलांच्या सहभागाबाबत सोमवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला. दहीहंडी पथकात यापुढे 14 वर्षाखालील मुलांना सहभागी होता येणार नाही तसेच थरांच्या उंचीसंबंधी राज्य सरकारने निर्णय घ्यावा असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच वयोमर्यादेची अटही 18 वरुन 14 करण्यात आली आहे. थरांची उंची किती असावी हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही. तो राज्य सरकारच्या अधिकारक्षेत्रातला विषय आहे. 

विधिमंडळाने थरांसंबंधी निर्णय घेऊन आवश्यक ते निर्देश द्यावेत. आम्ही काही आदेश देणे हा विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप ठरेल असे उच्च न्यायालयाने सांगितले. राज्य सरकारने कायदा करुन 2015 साली दहीहंडीचा समावेश साहसी क्रीडा प्रकारात केला होता. दहीहंडी खेळताना दुर्घटना घडल्यास पीडितांना नुकसान भरपाईपोटी तात्काळ 10 लाख रुपये देण्याचे निर्देश दहीहंडी समन्वय समितीला देण्यात आले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला याप्रकरणी  सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. दहीहंडी पथकात 14 वर्षाखालील मुले नसतील असे आश्वासन सरकारने कोर्टाला दिले आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपायोजना करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. मागच्यावर्षी न्यायालयाने 18 वर्षाखालील मुलांना दहीहंडी पथकात सहभागी होण्यावर बंदी घातली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे सर्वच दहीहंडी पथकांचे लक्ष लागले होते. महिन्याभरापासून सराव करणा-या दहीहंडी पथकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.  दरवर्षी हंडीबरोबर थरांची उंची वाढत चालल्याने गोविंदांच्या अपघाताची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी यासंबंधी याचिका दाखल केली होती.

मागच्यावर्षी सुद्धा न्यायालयाने हंडीच्या उंचीवर मर्यादा आणणारे काही निर्णय दिले होते. पण आता आधीचे निर्णय विचारात न घेता नव्याने सुनावणी झाली. दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष आशिष शेलारही हायकोर्टात उपस्थित होते. दहीहंडीचे थर हा संस्कृतीचा भाग असून,  चीन आणि  स्पेनमध्येही मानवी मनोरे रचले जातात असा युक्तीवाद राज्य सरकारच्यवतीने कोर्टात करण्यात आला.  जयजवान, माझगाव ताडवाडी या गोविंदा पथकांमध्ये आठ ते नऊ थर रचण्याची क्षमता आहे. मागच्या काही वर्षांपासून या पथकांनी लीलया थर रचून विक्रम केला आहे.