शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणेला घरघर

By admin | Updated: June 5, 2017 02:56 IST

रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दांडी सत्रामुळे आरोग्य यंत्रणेला चांगलीच घरघर लागली आहे.

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दांडी सत्रामुळे आरोग्य यंत्रणेला चांगलीच घरघर लागली आहे. आधीच रिक्त पदांमुळे आरोग्य विभागाचे ठोके वाढलेले असतानाच असुविधांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये सामान्यांना परवडणारी ठोस पर्यायी आरोग्य व्यवस्थाच नसल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागत आहे. यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत आहे.रायगड जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुधारावी, यासाठी कोणतेही लोक प्रतिनिधी कणखर पावले टाकताना दिसून येत नाही. अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणची आरोग्य व्यवस्था सुदृढ असावी, असे कोणालाच वाटत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल २६ लाखांच्या आसपास आहे. त्याचप्रमाणे महाड-१, महाड-२, रोहे, उसर, नागोठणे, विळेभागाड, तळोजा आणि पाताळगंगा असे सर्वाधिक मोठे औद्योगिक क्षेत्र याच जिल्ह्यात आहे. जिल्ह्यामध्ये एक हजार ७०२ सूक्ष्म उद्योग आहेत, तर ८९४ लहान, ३३ मध्यम आणि २५४ मोठे असे एकूण दोन हजार ८८३ प्रकल्प आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा पसारा असताना मात्र येथील आरोग्य व्यवस्था ही अपुरी आहे.रायगड जिल्ह्यासाठी एक जिल्हा रु ग्णालय, पाच उपजिल्हा रु ग्णालये, आठ ग्रामीण रु ग्णालये आहेत. या रुग्णालयांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भेडसावत आहे. ६९ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्याचा थेट परिणाम सामांन्याच्या आरोग्यावर होत आहे. त्यातच १८ वैद्यकीय अधिकारी हे अनधिकृत गैरहजर असल्याने कार्यरत वैद्यकीय अधिकारी, तसेच रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी पाठवूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे रुग्णालय प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जन, कान-नाक-घसा तज्ज्ञ, रेडिआॅलॉजिस्ट यांसारख्या तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे येथे शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळत नाहीत. एखाद्या गंभीर आजारावरील शस्त्रक्रि येसाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने, रुग्णांना अधिकच्या उपचारासाठी मुंबईची वाट धरावी लागत आहे. मात्र, सर्वसामान्यांना मुंबईमध्ये जाऊन उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांची तेथे परवड होते. अधिकच्या उपचारासाठी जाताना रस्त्यातच प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णाचा मृत्यू प्रवासात होण्याचेही प्रकार घडले आहेत.लवकरच सुधारणा-डॉ. अजित गवळीजिल्हा सामान्य रुग्णालयासाठी रिलायन्स कंपनीने सीएसआर फंडातून सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यासाठी मंजूर झालेले सिटी स्कॅन मशिन रत्नागिरी जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे. आपल्याकडे आधीच मशिन आल्याने मंजूर झालेले मशिन त्यांना देण्यात आले आहे. तेथील नागरिकांनाही त्याची गरज आहे. आपल्याकडे सिटी स्कॅन करण्यासाठी रु ग्णांची गर्दी असते. सध्या रु ग्णांना खासगी सेवा घ्यावी लागत आहे. आपल्याकडील सिटी स्कॅन मशिन रुग्णांसाठी लवकरच खुले करण्यात येईल, जेणेकरून त्यांच्या पैशांसह वेळेचीही बचत होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उर्वरित असुविधेबाबत लवकरच सुधारणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्य आरोग्य विभागाकडून रायगड जिल्ह्यात हजर होण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश काढण्यात येतात. मात्र, बरेच अधिकारी हजर होऊन जिल्ह्यातून पळ काढीत आहेत. याची कारणे शोधण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाहीत. १८ वैद्यकीय अधिकारी परस्पर रजेवर गेले आहेत. याबाबत जिल्हा रु ग्णालय प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने आरोग्य विभागाकडे पाठविला आहे.रायगड जिल्हा सामान्य रु ग्णालयात वर्ग-एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १९ पदे आहेत. त्यापैकी ९ पदे भरली आहेत. मात्र, त्यामधील एक वैद्यकीय अधिकारी गैरहजर आहे. वर्ग-दोनच्या १०० पदांपैकी ५९ पदे भरली आहेत. मात्र, त्यातील प्रत्यक्षात ४२ वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत आहेत. १७ वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहिले आहेत.