शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हेल्थ केअर मॉडेल जिल्ह्यात मराठवाड्याला वाटाण्याच्या अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 17:15 IST

राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा हेल्थ केअर मॉडेल जिल्हा मोहिमेत समावेश शासनाने केला असून, त्यामध्ये मराठवाड्यातील एकही जिल्हा नाही. मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्याचा जर समावेश झाला असता, तर मागासलेल्या या विभागाच्या जखमेवर फुंकर मारल्यासारखे झाले असते. 

ठळक मुद्देमराठवाड्याला सापत्न वागणूक मराठवाडा विकास मंडळ सदस्यांचे वित्त व नियोजन खात्याला पत्र 

- विकास राऊत औरंगाबाद, दि. ३  : राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा हेल्थ केअर मॉडेल जिल्हा मोहिमेत समावेश शासनाने केला असून, त्यामध्ये मराठवाड्यातील एकही जिल्हा नाही. मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्याचा जर समावेश झाला असता, तर मागासलेल्या या विभागाच्या जखमेवर फुंकर मारल्यासारखे झाले असते. 

मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि औरंगाबाद यापैकी एकही जिल्हा शासनाला मॉडेलमध्ये घ्यावासा का वाटला नाही. याबाबत मराठवाडा विकास मंडळ सदस्यांनी वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना खरमरीत पत्र दिले आहे. मुळातच ‘मराठवाड्याचे आरोग्य’ हा विषय शासनाच्या लेखी दुर्लक्षित राहिलेला आहे. आरोग्याच्या सर्वच इंडिकेटरमध्ये मराठवाडा मागे आहे.

प्राथमिक आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी एकाच डॉक्टरच्या खांद्यावर आहे. ३० ते ४० टक्के जागा रिक्त आहेत. पायाभूत सुविधांची वाईट अवस्था आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. किडनी, हृदय, लिव्हर आदी आजारांवरील उपचारांसाठी पुणे, मुंबई, हैदराबाद येथे रुग्णांना जावे लागते. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मराठवाड्यात असणे गरजेचे आहे. मानसोपचारासाठी येरवडा, ठाणे, नागपूरला येथील रुग्ण भरती करावे लागतात. अशी परिस्थिती असताना शासनाने मराठवाड्यातील आरोग्य विकासाला वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. 

मराठवाड्याचा समावेश करा मंडळातील तज्ज्ञ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी अर्थमंमत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, मॉडेल आरोग्य जिल्ह्याची संकल्पना चांगली आहे. विदर्भ, कोकण इत्यादी ठिकाणांसोबत मराठवाड्याचाही त्यात समावेश असावा. मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्याचा समावेश होणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत मराठवाड्याचा अनुशेष बराच मोठा आहे. तो दिवसेंदिवस वाढतो आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे असल्यामुळे विकासगंगा त्या प्रदेशात जास्त प्रमाणात वळविण्यात येत असल्याचे आता लपून राहिलेले नाही.

चांदा ते बांदा हा विकासमार्ग मराठवाड्यातून का जात नाही. महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याला वगळणे योग्य वाटत नाही. विभागातील वैद्यकीय शिक्षण सुविधा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था बिकट आहे. मराठवाडा विकास मंडळातर्फे एक्स-रे ते कॅथलॅब टेक्निशियनपर्यंत तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मराठवाड्यात उभारणे गरजेचे आहे.