शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांवर आता ‘कलम ४२०’ नाही

By admin | Updated: September 11, 2015 03:36 IST

‘सरल’ या उपक्रमाअंतर्गत माहिती भरताना शाळांनी चुकीची माहिती दिल्यास मुख्याध्यापकांना भारतीय दंड विधानाचे ४२० हे कलम लावण्यासंदर्भातील मुद्दा संबंधित परिपत्रकातून

पुणे : ‘सरल’ या उपक्रमाअंतर्गत माहिती भरताना शाळांनी चुकीची माहिती दिल्यास मुख्याध्यापकांना भारतीय दंड विधानाचे ४२० हे कलम लावण्यासंदर्भातील मुद्दा संबंधित परिपत्रकातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी विद्यार्थी संख्येसंदर्भात जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरल्याचे आढळल्यास शासनाची फसवणूक समजून कारवाई केली जाणार असल्याचेही शिक्षण विभागातील वरिष्ठांनी स्पष्ट केले आहे.राज्य शालेय विभागाने शाळासंबंधीची चुकीची माहिती जाऊ नये, शाळा, विद्यार्थी-शिक्षकांचे प्रमाण, शाळेत येणारी विद्यार्थी संख्या, त्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती, शालेय शिक्षकांची पदोन्नती, त्यांचा पगार, केंद्रप्रमुखाची संख्या इत्यादी या सगळ्यांची संकलित माहिती करण्यासाठ सरल ही डेटाबेस प्रणाली तयार केली आहे. सरलची माहिती भरताना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र भरून घ्यावे, असे परिपत्रक शिक्षण संचालनालयाकडून शाळांना आले होते. त्यात विद्यार्थ्यांची अथवा शाळेची माहिती भरताना चूक झाल्यास कलम ४२० अन्वये कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला होता.परिपत्रकातील या विधानावर विविध आक्षेप घेतला होता. राज्य शिक्षण संचालक एन. के. जरग म्हणाले, ‘सरल या डेटाबेस प्रणालीचा मुख्य उद्देश शासनाकडे योग्य माहितीसंकलन व्हावे हा आहे. ९९ टक्के शाळा या प्रामाणिक असून खरी माहिती भरतील अशी अपेक्षा आहे. कदाचित एखादा टक्का चुकीची माहिती भरेल आणि त्यांनी तशी भरू नये यासाठी या कलमाचा धाक होता. मात्र, हे कलम आता वगळण्यात आले आहे.’