शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

तो रिक्षाचालक आला दूत म्हणुन संजय पवारच्या सतर्कतेमुळे वाचले ३०० जणांचे जीव

By अनिकेत घमंडी | Updated: October 28, 2017 18:16 IST

नागुबाई निवास या चार मजली इमारतीमधील ६९ कुटूंबियांसाठी संजय पवार हा रिक्षाचालक दूत बनुन आला. संजय या इमारतीच्या तळमजल्यावर राहतो. दिवसभर रिक्षा चालवून तो रात्री ८ च्या सुमारास घरी आला होता. त्यावेळी कुटूंबासमवेत चर्चा करत असतांना त्याला रात्री ८.३० च्या सुमारास घरातील एका भिंतिचा खालचा भाग तुटत असल्याचे जाणवले. तसेच दरवाजाजवळचा भाग खचत असल्याचे दिसले.

ठळक मुद्देनागुबाई निवास या चार मजली इमारतीरिक्षाचालक दूत

डोंबिवली: नागुबाई निवास या चार मजली इमारतीमधील ६९ कुटूंबियांसाठी संजय पवार हा रिक्षाचालक दूत बनुन आला. संजय या इमारतीच्या तळमजल्यावर राहतो. दिवसभर रिक्षा चालवून तो रात्री ८ च्या सुमारास घरी आला होता. त्यावेळी कुटूंबासमवेत चर्चा करत असतांना त्याला रात्री ८.३० च्या सुमारास घरातील एका भिंतिचा खालचा भाग तुटत असल्याचे जाणवले. तसेच दरवाजाजवळचा भाग खचत असल्याचे दिसले.त्याची संजयने तात्काळ दखल घेत हा प्रकार काहीतरी वेगळा असल्याची सतर्कता दाखवली. त्याने तातडीने त्याच्या भावाशी चर्चा केली. भावानेही ही घटना गंभीर असल्याचे सांगितले. तेवढ्यात संजयला पिलर खचला असल्याचे दिसले, त्यानंतर मात्र त्याने क्षणाचाही विलंब न लावता आरडाओरडा केला. तडक चौथ्या मजल्यावर धाव घेतली. दिसेल त्याचा दरवाजा वाजवला. दिसेल त्याला बोलावले, आवाज दिला. पळापळा बाहेर पडा असे सांगितले. संजयचा आवाज आल्याने अन्य रहिवाश्यांनीही नेमके काय झाले हे बघण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. इमारतीला तडे पडत असून माती पडत असल्याचे ऐकल्यावर मात्र रहिवाश्यांनी जीव मुठीत धरुन जीन्यावरुन पळ काढला. जसे जमेल तसे सगळे घराबाहेर आले. तरीही संजयने पुन्हा सगळया घरांमध्ये जात कोणी राहीले नाही ना याची चाचपणी केली. सगळे बाहेर येताच तिस-या आणि चौथ्या मजल्यावरील गॅलरीचा भिंतीला तडे गेले. काही काळातच इमारत कोसळणार या भितीने रहिवासी तणावाखाली होते. मात्र कोणीही इमारतीत नसल्याने केवळ संजयच्या सतर्कतेमुळे शेकडो रहिवाश्यांमुळे जीव वाचला. त्यामुळे त्याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. पश्चिमेच्या रिक्षा चालक-मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी संजयचे विशेष कौतुक केले. महापौर राजेंद्र देवळेकर यांनाही ती माहिती मिळाल्यावर त्यांनी संजयच्या सतर्कपणाबद्दल समाधान व्यक्त केले.संजयने या इमारतीमधील रहिवाश्यांना घराला घर मिळावे, कोणावरही अन्याय होता कामा नये. घर मालकानेही सहकार्य करावे, महापालिकेने घर कधी, किती अवधीत मिळणार याची शाश्वती रहिवाश्यांना द्यावी,अशी अपेक्षा ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.========

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली