शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

मुंबईत दिवसाढवळया त्याने तरुणीसमोर सोडली लाज

By admin | Updated: July 14, 2017 13:24 IST

तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन केल्याची घटना ताजी असतानाच असाच एक प्रकार पवईमध्येही समोर आला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 14 - तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन केल्याची घटना ताजी असतानाच असाच एक प्रकार पवईमध्येही समोर आला आहे. दुचाकीवरुन आलेल्या एका तरुणाने 19 वर्षीय युवतीला आपल्या पँटची चैन खोलून दाखवली. गुरुवारी भरदिवसाढवळया ही घटना घडली. पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजमधून घरी परतत असताना पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पवई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, आरोपीला पकडण्यासाठी पोलीस इटर्निया बिल्डींगजवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. 
 
या घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रीणीने लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. तरुणी कॉलेजमधून बाहेर पडल्यापासून दुचाकीस्वार तिचा पाठलाग करत होता. एका टप्प्यावर आरोपीने तरुणीला गाठून तिच्यासमोर स्वत:च्या पँटची चैन खोलली व अश्लील चाळे केले. तरुणीने आरडाओरडा सुरु केल्यानंतर त्याने दुचाकीवरुन पळ काढला. त्याने डोक्यात हेलमेट घातले नव्हते. 
 
आरोपीला पकडण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे असे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. घटनास्थळी पोहोचलेल्या दोन पोलिसांनी धाक दाखवून पीडित तरुणीला पळवून लावल्याचा आरोप रेड्डी यांनी फेटाळून लावला. पीडित तरुणी पवईमध्येच रहाते. महिला पोलीस अधिका-याने तरुणीच्या घरी जाऊन तक्रार नोंदवून घेतली. 
 
आणखी वाचा 
तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणाचे विकृत चाळे
मुंबई लोकलमध्ये तरुणीसमोर विकृताचे अश्लील चाळे, रेल्वे प्रशासनानं केलं दुर्लक्ष
विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्यास अटक
 
आम्ही कॉलेजवरुन घरी परतत असताना दुचाकीस्वार आमचा पाठलाग करत होता. काही मीटरवरुन त्याने आम्हाला अश्लील हातवारे करुन दाखवले. आम्ही आमचे पुढे चालणे सुरुच ठेवले त्यावेळी आरोपीने पुन्हा गाठून अश्लील हातवारे केले. अखेर आम्ही आरडाओरडा सुरु केल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. बाईकची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी आरटीओची मदत मागितली आहे. कलम 354 आणि 509 कलमातंर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 
बोरीवलीपाठोपाठ तपोवन एक्स्प्रेसमध्येही तरुणीला पाहून हस्तमैथुन करण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तब्बल १३ दिवसांनंतर या प्रकरणाला सोशल मीडियातून वाचा फोडण्यात आली. हा व्हिडीओ रेल्वे पोलिसांच्या निदर्शनात येताच, अवघ्या सहा तासांत त्यांनी अशोक प्रधान (२०) या विकृत तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.