शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जडीबुटीची विक्री करीत तो झाला पदवीधर

By admin | Updated: March 27, 2017 02:23 IST

पंधरा जणांच्या पालातील कुटुंबात वास्तव्य करणारा, शिक्षणाचा घरात गंध नसताना गल्लीगल्लीतून आणि खेड्यापाड्यांतून

बाळासाहेब कुलकर्णी / सासवडपंधरा जणांच्या पालातील कुटुंबात वास्तव्य करणारा, शिक्षणाचा घरात गंध नसताना गल्लीगल्लीतून आणि खेड्यापाड्यांतून जडीबुटीची विक्री करीत फिरणाऱ्या भटक्या विमुक्त जातीच्या समाजातील २२ वर्षीय युवकाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वत:ला बदलण्याचा ध्यास घेतला आणि बघता-बघता हा तरुण वाणिज्य शाखेचा पदवीधर झाला. केवळ पदवीधरच नव्हे, तर आता चक्क एम.कॉमच्या दुसऱ्या वर्षाचा अभ्यास करतोय. ही गोष्ट आहे सासवडच्या हिवरे रस्त्यावरील लक्ष्मीनगरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या चितोडी लोहार समाजातील एका युवकाची.रामूसिंग जनकसिंग चितोडिया असे या युवकाचे नाव आहे. चाळीसगाव हे त्याचे मूळ गाव असून, सुमारे २० कुटुंबे आणि ८० पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ही मंडळी सुमारे १५ वर्षांहून अधिक काळ सासवडच्या हिवरे रस्त्यावरील लक्ष्मीनगरात राहून परिसरात जडीबुटी विक्री करून गुजराण करीत आहेत.जवळच्याच नातेवाइकांची मदत घेत पुण्यात भोसरी येथील समता माध्यमिक विद्यालयात अनेक अडचणींवर मात करीत पहिली ते पाचवीपर्यंतचे त्याने शिक्षण पूर्ण केले. कौटुंबिक अडचणीमुळे परत शिक्षणात व्यत्यय आला; पण मुख्याध्यापक पडवळ सर व वर्गशिक्षक कदम सर यांच्या प्रयत्नातून १७ नंबरचा फॉर्म भरून रामूसिंग छोटी-मोठी कामे करून २००९मध्ये ५० टक्के गुण मिळवून दहावी पास झाला. त्याच्यातील शिक्षणाची ओढ त्याला गप्प बसू देईना. २०११मध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर तो बारावी झाला. त्यानंतर कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेऊन २०१५ला बी. कॉम पदवी घेतली.आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा...रामसिंग, भगवानसिंग आणि महेंद्रसिंग या आपल्या तीन भावांसोबत झोपडीत राहत असलेल्या रामूसिंगसह एकूण १५ जणांचे हे कुटुंब आहे. रामूसिंगच्या शिक्षणवेडामुळे त्याच्या भावांची चार मुलेदेखील सासवडला शाळेत जात आहेत. रामूसिंगने झोपडपट्टीतील अन्य कुटुबांनाही शिक्षणाचे महत्त्व सांगितल्याने सुमारे २० मुले सध्या शिक्षण घेत आहेत. रामूसिंग याचा भाऊ भगवानसिंग हा केवळ दुसरी शिकला आहे. शासकीय अनुदान, रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात आणि सर्वांत महत्त्वाचे समाजाने आमच्या जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, अशी अपेक्षा रामूसिंग आणि त्याचे कुटुंबीय करीत आहेत. भावांची पायपीट थांबवायचीय..सध्या रामूसिंग सासवडच्याच एका पतसंस्थेत काम करीत एम.कॉमचा अभ्यास करतोय. एम.कॉम पूर्ण झाल्यावर एखादी सरकारी नोकरी मिळून कुटुंबाला हातभार लावण्याची आणि आपल्या ३ मोठ्या भावांची पायपीट थांबवण्याची स्वप्ने सध्या तो पाहतोय...