शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

अण्णांच्या यात्रेवर अवकाळी संकट !

By admin | Updated: March 18, 2015 01:29 IST

किसान संघर्ष यात्रेवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या रुपाने संकट उभे ठाकले असून ही यात्रा रद्द करण्यात येणार असल्याचे समजते़

पारनेर (अहमदनगर) : भूसंपादनाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून ३० मार्चपासून वर्धा ते दिल्ली काढण्यात येणाऱ्या किसान संघर्ष यात्रेवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या रुपाने संकट उभे ठाकले असून ही यात्रा रद्द करण्यात येणार असल्याचे समजते़अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त झालेला शेतकरी, वाढते ऊन, गव्हाची काढणी व आदी कारणास्तव यात्रा रद्द करण्याबाबत ठरल्याची सूत्रांनी माहिती दिली. राज्यसभेत भूमी संपादन कायद्यावर काय निर्णय होतो, त्यानंतर जाहीर सभांबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे समजते. भूसंपादनाच्या विरोधात अण्णांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांना पत्र पाठविली आहेत. मोदी सरकारचा भूमी संपादन कायदा शेतकरीविरोधी असल्याचे सांगत देशभरातील शेतकरी संघटनांनी त्यास विरोध केला होता. अण्णांनी शेतकरी संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. कायद्याविरोधात दिल्लीत जंतरमंतरवर धरणे आंदोलनही केले होते. त्यानंतर वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढण्याची घोषणाही वर्धा येथील बैठकीनंतर करण्यात आली होती. मात्र राज्यसभेत भूमी संपादन विधेयक संमत झाल्यावर आंदोलन करता येणार नाही़, ही भूमिका अण्णांनी मांडली आहे. त्याचाच भाग म्हणून अण्णांनी राज्यसभेत विधेयक संमत होऊ नये म्हणून सोनिया गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांना पत्र पाठवून सरकारच्या विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. काही शेतकरी संघटनांनी अण्णांची राळेगणसिद्धीत भेट घेऊन अण्णांना पदयात्रेऐवजी मोठी शहरे, गावांमध्ये जाहीर सभा घेण्याबाबत सुचविले आहे. (प्रतिनिधी)च्अण्णांच्या कार्याने प्रेरित होऊन महाराष्ट्रासह विविध राज्यांतील दीड हजार युवक व ज्येष्ठ नागरिकांनी देशसेवेचे काम करणार असल्याचे शपथपत्र त्यांना दिले आहे़ मंगळवारी राळेगणसिद्धीत कार्यकर्ता शिबिर झाले. हजारे यांनी देशासाठी काम करणाऱ्यांना बरोबर घेऊन राष्ट्रीय संघटनेची बांधणी करणार असल्याचे सांगितले़विचार सुरू किसान यात्रा रद्द करण्याचा विचार सुरू आहे. विदर्भासह इतर राज्यांत पुढील दोन महिने कडक उन्हाळा असतो. काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या गव्हाच्या कापण्यांमुळे शेतकरी कामात आहेत. शिवाय राज्यसभेत विधेयकाचे काय होते त्यावरच आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.