शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

UPSC परीक्षेत सोलापूरचा पठ्ठ्या देशात पहिला, हर्षल भोसलेनं करुन दाखवलं

By appasaheb.patil | Updated: October 26, 2019 21:59 IST

पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश; आयोगाकडून नुकताच निकाल जाहीर

ठळक मुद्दे- हर्षल भोसले हा तांडोर (ता़ मंगळेवढा) येथील रहिवासी- आईएसच्या मुलाखती सप्टेंबर महिन्यात झाल्या होत्या- हर्षलच्या यशाने तांडोर निवासस्थानी शुभेच्छांसाठी ग्रामस्थांसह नातेवाईकांची गर्दी

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत तांडोर (ता. मंगळवेढा) येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हर्षल पाच वर्षांचा असताना त्याचे वडील वारले. त्यानंतर आईने शेती करून हर्षलचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे शालेय शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा, नववी ते दहावी माध्यमिक आश्रमशाळा देगाव, डिप्लोमा गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक बीड, डिग्री गव्हर्न्मेंट कॉलेज, कराड येथे पूर्ण झाल्यानंतर भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथे एक महिन्याचे ट्रेनिंग घेऊन राजीनामा दिला.त्यानंतर आॅईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, पुणे येथे त्याची निवड झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (इंजिनिअर सर्व्हिसेस) प्रिलीम जानेवारी महिन्यात व मेन्स परीक्षा जून महिन्यात दिली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखत झाली. शुक्रवार, २५ आॅक्टोबर रोजी निकाल लागला अन् हर्षलने देशात पहिला येण्याचा मान मिळविला. 

लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी जानेवारीत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण उमेदवारांचा सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात मुलाखतींचा टप्पा पार पडला होता. हर्षल भोसले याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे़ आयोगाने संकेतस्थळावर नुकताच निकाल जाहीर केला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरexamपरीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षण