मुंबई : वडाळा ते जीटीबीदरम्यान रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाल्याची घटना घडली. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेत हार्बर सेवा पूर्ववत होण्यास अर्धा तास लागला. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वडाळा ते जीटीबी स्थानकादरम्यान डाउन मार्गावर रुळाला तडे गेल्याची घटना घडली. डाउन मार्गावर घडलेली ही घटना निदर्शनास येताच, रूळ दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. तोपर्यंत अप मार्गावरील वाहतूक सुरूच होती, परंतु डाउन मार्गावरून लोकल धावण्यास अडथळा येत असल्यामुळे, अप दिशेला येणाऱ्या लोकलही वडाळा ते सीएसटीदरम्यान अत्यंत ुधिम्या गतीने धावत होत्या. रुळांचा बिघाड दुरुस्त करण्यासाठी अर्धा तास लागला. मात्र, तोपर्यंत अप आणि डाउन मार्गावरील हार्बर रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. ते पूर्वपदावर आणण्यासाठी बराच वेळ लागला. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. (प्रतिनिधी)
रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत
By admin | Updated: April 4, 2017 06:06 IST