शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'चित्रपटाला आवाज देणं सोपं नव्हतं, पण शिवरायांचा चित्रपट म्हणून आवाज दिला'-राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 19:49 IST

'हर हर महादेव' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली.

मुंबई: अभिनेता सुबोध भावे लवकरच शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित 'हर हर महादेव' चित्रपटात दिसणार आहे. सुबोध शिवरायांच्या भूमिकेत आहे, तर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे. या निमित्ताने सुबोधने राज ठाकरेंची मुलाख घेतली.

बाळासाहेबांनी राज नाव दिलेयावेळी राज ठाकरेंनी चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से सांगितले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यात पहिल्यांदा कधी आले, त्यावरही भाष्य केले. मुलाखतीच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी त्यांच्या नावावर प्रतिक्रिया दिली. सुबोध भावे म्हणाले की, तुमचे खरे नाव स्वरराज, मग राज ठाकरे कस झाले? यावर राज ठाकरे म्हणाले, 'माझ्या वडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी संगीतात काहीतरी करेन, असे त्यांना वाटायचे. पण, मी व्यंग काढायला लागलो. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मी बाळा ठाकरे नाव लावतो, तू राज ठाकरे लाव. तेव्हा माझे दुसऱ्यांदा बारसे झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य दिव्य सिनेमा घेऊन येतोय, काम सुरूय; राज ठाकरेंची घोषणा

राज ठाकरेंनी 17 दिवस डबिंग केले हर हर महादेव चित्रपटाला आवाज का दिला? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, 'मी पहिल्यांदा 2003मध्ये व्हॉइस ओव्हर केला होता. तेव्हा बाबासाहेब पुरंदरेंची मुलाखत घेतली होती. 2004ला शिवसेनेचे कँपेन केले होते, तेव्हा 9 अॅड फिल्म्स केल्या होत्या, त्यांना अजित भुरेंनी आवाज दिला. त्यातील एका फिल्ममध्ये सुरुवातीचा आवाज दिला होता. या चित्रपटाला आवाज देण्याचे कारण म्हणजे, चित्रपट शिवरायांचा आहे. याच कारणामुळे आवाज दिला.'

'शिवनेरीवर गेलो होतो, अचानक एक हात खांद्यावर आला अन्...' राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

शिवराय आयुष्यात कधी आले?राज ठाकरे म्हणाले, '1974 मध्ये मी दुसरीत होतो तेव्हा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा शिवराय आले. बाबासाहेब पुरंदरेंनी मुंबईत शिवसृष्टी उभारली होती. ती शिवसृष्टी बनत असताना, बाळासाहेबांचे त्यात मोठे योगदान होते. बाळासाहेब रोज तिथे जायचे आणि मीही त्यांच्यासोबत असायचो. ती बनली आणि संपेपर्यंत 15-20 दिवस मी रोज तिथेच जायचो. मी रोज राज्याभिषेक सोहळा पाहिला आणि शिवराय माझ्या आयुष्यात आले,' अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSubodh Bhaveसुबोध भावे