शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

शुभ वर्तमान : नाशिकमध्ये वाढला मुलींचा जन्मदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 22:34 IST

नाशिक शहरात हजार मुलांमागे असलेला मुलींचा जन्मदर ९२५ वरून ११०० वर जाऊन पोहोचला आहे.

नाशिक : नाशिक शहरात हजार मुलांमागे असलेला मुलींचा जन्मदर ९२५ वरून ११०० वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या काही महिन्यांत बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्यानेच मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींचा घटता जन्मदर चिंतेचा विषय बनलेला आहे. नाशिक शहरात डिसेंबर २०१६ मध्ये मुलींचा जन्मदर हा हजार मुलांमागे ८८० इतका होता. तो आता मे २०१७ मध्ये ११०० इतका झाला आहे. नाशिक महापालिकेनेही गेल्या काही महिन्यांत बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय, सोनोग्राफी सेंटरचीही तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, गेल्या मार्चपासून मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ होत तो दर हजारी ११०० इतका झाला आहे. महापालिकेमार्फत शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञांकडून प्रसूतीसह गर्भपाताविषयीचा दैनंदिन अहवाल व्हॉट्सअ‍ॅप व ई-मेलवर मागविला जात असून, गर्भपातविषयक प्रत्येक गोळ्या-औषधांचा हिशेब घेतला जात असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे. महापालिकेने शहरातील सोनोग्राफी सेंटरची ७२ पथकांच्या साहाय्याने तिमाही तपासणीही सुरू केली आहे. शहरात सद्यस्थितीत ४२७ सोनोग्राफी सेंटर असले तरी २२९ सेंटर प्रत्यक्ष कार्यरत आहेत तर ३० तात्पुरत्या स्वरूपात बंद आहेत. १६८ केंद्र कायमस्वरूपी बंद आहेत. कुठे बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही डॉ. डेकाटे यांनी सांगितले. इन्फोलिंग गुणोत्तर प्रमाणमहिना प्रमाणडिसेंबर २०१६ ८८०जानेवारी २०१७ ९४०फेबु्रवारी ८९४मार्च १११०एप्रिल १२००मे ११००