शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे डब्यात दीड वर्षाचे बालक

By admin | Updated: February 23, 2017 02:12 IST

दौंड रेल्वे स्थानकात पुणे-हाटिया एक्सप्रेसमध्ये दीड वर्षाच्या बालकाला त्याचे आई-वडील सोडून गेले

दौंड : दौंड रेल्वे स्थानकात पुणे-हाटिया एक्सप्रेसमध्ये दीड वर्षाच्या बालकाला त्याचे आई-वडील सोडून गेले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. दरम्यान रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या बालकाला एकप्रकारे नवीन जन्मच मिळाला.कोणाचेही हृदय गहिवरुन येईल, अशी या बालकाची रेल्वेच्या डब्यात स्थिती झाली होती. पुणे-हाटिया एक्सप्रेस गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आली तेव्हा एस ११ या बोगीतील स्वच्छतागृहाजवळ सदरचे बालक रडत होते. त्याला कोणीही वाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना ही घटना कळविण्यात आली. त्यानुसार पोलीस या डब्याजवळ आले. त्यांनी या बालकाला उचलून घेतले. गाडी जाईपर्यंत त्याच्या आई-वडिलांचा शोध घेतला, मात्र कोणीच या मुलाला वाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर हाटिया एक्सप्रेस गेल्यावर या मुलाला पोलीस स्टेशनला आणले. त्यानंतर त्याला दूध, बिस्किट दिल्यावर मुलाचे रडणे थांबले. या मुलाला रेल्वे महिला पोलीस वनिता गोयेकर यांनी आपुलकीच्या नात्याने कपडे घेतले.  एकंदरीतच पोलिसांनी  केलेल्या तपासानुसार या बालकाचे आई-वडील त्याचे पालनपोषण करण्यास असमर्थ असल्यामुळे या  बालकाला रेल्वेच्या डब्यात  सोडून गेले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती  रेल्वे पोलीस दीपक बाळेकुद्री यांनी दिली. (वार्ताहर)... पोलिसांना अश्रू अनावर झाले ४सायंकाळच्या सुमारास दौंड रेल्वे पोलिसांनी या बालकाला त्यांच्या गाडीतून केडगाव (ता. दौंड) येथील बालक आश्रमात सोडले. त्या वेळी पोलिसांनादेखील अश्रू अनावर झाले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीनुसार या बालकाच्या मदतीला पोलीस धावून आल्याने त्याला एकप्रकारे नवजन्मच मिळाला, असेच म्हणावे लागेल.