शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

दरडीवरील झोपड्या मृत्यूच्या छायाखाली!

By admin | Updated: May 12, 2014 02:39 IST

ऐन पावसाळ्यात मुंबईतील दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमुळे शेकडो निष्पाप जीवांचे बळी यापूर्वी गेले असतानाच येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासंबधी प्रशासनाने अद्याप काहीच हालचाल केलेली नाही.

दरडीवरील झोपड्या मृत्यूच्या छायाखाली!मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबईतील दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमुळे शेकडो निष्पाप जीवांचे बळी यापूर्वी गेले असतानाच येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासंबधी प्रशासनाने अद्याप काहीच हालचाल केलेली नाही. महत्वाचे म्हणजे दोन वर्षांपासून यासंदर्भातील कृती आराखडा तयार करण्याबाबतही काहीच कार्यवाही करण्यात आली नसल्याने मे महिन्याच्या उत्तरार्धातच याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी ओरड होत आहे.पावसाळ्यात दरड कोसळून निष्पाप जीवांचे बळी जाऊ नयेत; म्हणून अशा धोकादायक अथवा अतिधोकादायक ठिकाणांवरील रहिवाशांना सर्तकता म्हणून स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. तसे ते मागील वर्षीही करण्यात आले. परंतू येथील रहिवाशांच्या पुनर्वसंबधी काहीच पाऊले अद्याप उचलण्यात आलेली नाहीत.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरडीच्या भितीखाली असणार्‍या झोपडयांची संख्या २२ हजार ४८३ एवढी आहे. आणि सुमारे १.१५ लाख रहिवाशांच्या जीवाला या दरडींचा धोका आहे. मुंबई झोपडप˜ी सुधार मंडळानेच केलेल्या एका सर्वेक्षणांती ३२७ ठिकाणे धोकादायक असल्याचे समोर आले होते. संरक्षण भिंतीद्वारे होणार्‍या झोपडयांची संख्या १० हजार ३८१ असून, ताबडतोब स्थलांतरित झोपडयांची संख्या ९६५७ एवढी आहे.मुंबईतील २५ विधानसभा मतदार संघात ३२७ दरडीचे विभाग आहेत. महत्वाचे म्हणजे सुरक्षेची उपाययोजना म्हणून सरकारने दरडीलगत संरक्षण भिंत बांधण्यासाठी १९९२ सालापासून तब्बल २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र येथील झोपडीधारकांच्या पुनर्वसनासंबधी अद्याप कृती आरखडा तयार करण्यात आलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. (प्रतिनिधी)...................डोंगर उतारावरील झोपडीधारकांंच्या पुनर्वसबंधीचा कृती अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन वर्षांपूर्वी नगरविकास खात्याला दिले होते. मात्र नगरविकास खात्याने अद्याप काहीच कार्यवाही केलेली नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली....................विभागधोकादायक ठिकाणेमुंबई शहर४९मुंबई उपनगर२७८...................विभागझोपडयांची संख्याशहर३९८६पूर्व उपनगर८११३पश्चिम उपनगर७९३९...................दुर्घटना वर्षे आणि मृतांचा आकडावर्षे    मृत्यू१९९३  १७१९९६  १११९९७  ११२०००  ७८२००५ ७३२००९  ११