गुंतवणूकदारांचे कार्यालयात उपोषण : पीडितांना उपोषणाचे आवाहननागपूर : दामदुप्पटीच्या नावाखाली प्रशांत वासनकरने हजारो लोकांकडूून गोळा केलेल्या कोट्यवधींच्या ठेवी परतीवर प्रश्नचिन्ह आहे. ठेवी परत मिळविण्यासाठी त्याच्या रामनगर येथील कार्यालयात गेलेल्या गुंतवणूकदारांना धमकविण्याचे प्रकार वासनकर गुंडांच्या मदतीने करीत आहे. शनिवारी ५ च्या सुमारास वासनकराच्या एजंटांनी गुंतवणूकदारांना हुसकावून लावण्यासाठी चक्क दारू पिऊन हैदोस घातला. हा प्रकार सदर प्रतिनिधीसमोर बराच वेळ सुरू होता आणि त्यांनी प्रतिनिधीला पाहून घेण्याची धमकी देत वादही घातला.उपोषणकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यावासनकराच्या कार्यालयात पीडित देवीदास नागदिवे (२७ लाख) व त्यांची पत्नी शीला नागदिवे, मुलगी अॅड. मीनल नागदिवे (हायकोर्टात कार्यरत) व मुलगा यांच्यासह वर्षा भोयर व त्यांचे पती जितेंद्र भोयर (५० लाख) आणि विशाल मेश्राम (७ लाख) असे सात जण ठेवी परत मिळविण्यासाठी गुरुवार सकाळपासून उपोषणाला बसले आहेत. सर्वच उपोषणकर्त्यांना नानाविध प्रकारे त्रास देणे सुरू आहे. त्यांना दररोज जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. धमक्यांना न घाबरता त्यांचे उपोषण सुरूच आहे. रक्कम मिळेपर्यंत कार्यालय सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. एजंटांची उपोषणकर्त्यांना अश्लील शिवीगाळवासनकराचे पुरुष व महिला एजंट कम गुुंतवणूकदार उपोषणकर्त्यांवर घरी जाण्यासाठी वारंवार दबाव आणीत आहे. शनिवारी दुपारी एजंट देवदास खापरे आणि सुहास करदळे यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचे अॅड. मीनल नागदिवे यांनी सांगितले. उपोषणकर्त्याविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. पोलीस निरीक्षकांनी कार्यालयात येऊन मागण्या न्याय्य असल्याचे सांगून हस्तक्षेप करण्यास नकार दिला. पोलिसांची भूमिका संशयास्पदजवळपास २० ते २५ गुंतवणूकदारांनी एक महिनाआधीच प्रशांत वासनकराच्या विरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. चौकशी सुरू असल्याच्या नावाखाली पोलीस पीडितांची समजूत घालीत आहे. या धोरणामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा पीडितांचा आरोप आहे.
वासनकराच्या दारूड्या एजंटांचा हैदोस
By admin | Updated: July 27, 2014 01:30 IST