शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हॅकरने मागितली ५२ लाखांची खंडणी

By admin | Updated: July 1, 2017 07:46 IST

जेएनपीटीमधील गेटवे टर्मिनल्स इंडियाची संगणक प्रणाली २७ जूनला हॅक करण्यात आली आहे. कंपनीचे २७० संगणक व लॅपटॉप

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई, उरण : जेएनपीटीमधील गेटवे टर्मिनल्स इंडियाची संगणक प्रणाली २७ जूनला हॅक करण्यात आली आहे. कंपनीचे २७० संगणक व लॅपटॉप व्हायरसमुक्त करण्यासाठी प्रत्येकी ३०० डॉलर अशी एकूण ५२ लाख रुपयांची खंडणी हॅकरने मागितली असून, याविषयी जेएनपीटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) कंपनीच्या कायदेविषयी विभागाचे सहायक व्यवस्थापक व कंपनी सचिव म्हणून कार्यरत असलेले गिरीराज देशपांडे यांनी जेएनपीटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. जीटीआय ही एपीएम टर्मिनल्स कंपनीची उपकंपनी आहे. मुख्य कंपनी व उपकंपनीसाठी वापरण्यात येणारी संगणकप्रणाली एकच आहे. कंपनीचे जेएनपीटी पोर्ट येथे कंटेनर आयात-निर्यातीचे टर्मिनल्स असून ते जेएनपीटीकडून २००४ मध्ये ३० वर्षांच्या भाडेकरारावर घेतले आहे. या बंदरामध्ये रोज ५ ते ७ हजार कंटेनरची हाताळणी केली जात आहे. ही सर्व हाताळणी संगणक प्रणालीद्वारे केली जात आहे. यासाठी आवश्यक माहिती तंत्रज्ञान प्रणाली कंपनीच्या सर्व ग्रुपशी जोडण्यात आली आहे. कामकाजासाठी आवश्यक सर्व माहिती जीटीआय हाउसच्या सर्व्हरमध्ये आहे. २७ जूनला सायंकाळी ४ वाजता संगणक प्रणालीमध्ये व्हायरस शिरला. संगणकावर सर्व सिस्टीम हॅक केल्याचे मॅसेज दिसू लागले. अज्ञात व्यक्तीने सर्व यंत्रणा हॅक केली. यामुळे कंपनीमधील तब्बल २७० संगणक व लॅपटॉपमध्ये हा व्हायरस शिरला. संगणकामधील व्हायरस दूर करून सर्व माहिती पूर्ववत करण्यासाठी प्रतिसंगणक ३०० डॉलरची खंडणी मागितली आहे. सायबर हल्ल्यामुळे जीटीआय कंपनीचे सर्व कामकाज २७ जूनपासून ठप्प झाले आहे. कंपनीचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. याशिवाय कंपनीची प्रतिमा खराब झाली आहे. सायबर हल्ल्याविषयी इतर कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून काही उपाययोजना करता येतील का? याविषयी चाचपणी करण्यात आली; परंतु अद्याप त्याविषयी काहीही उपाय सापडलेला नाही. कंपनीच्या आयटी प्रमुखांशी चर्चा करूनही यामधून काही मार्ग सापडेल का? याची माहिती घेतली जात आहे; अखेर कंपनी व्यवस्थापनाने जेएनपीटी पोलीस स्टेशनमध्ये हॅकरविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.