शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: January 22, 2017 01:21 IST

नुकत्याच केईएम रुग्णालयात करण्यात आलेल्या गर्भपाताच्या प्रकरणातील महिलेला या सोनोग्राफीत गर्भाच्या अवस्थेचे निदान झाले नाही. त्यानंतर, थेट १२व्या आठवड्यात सोनोग्राफीत

- डॉ.अविनाश सुपे

नुकत्याच केईएम रुग्णालयात करण्यात आलेल्या गर्भपाताच्या प्रकरणातील महिलेला या सोनोग्राफीत गर्भाच्या अवस्थेचे निदान झाले नाही. त्यानंतर, थेट १२व्या आठवड्यात सोनोग्राफीत गर्भाचे डोके नसल्याने ते जगू शकणार नाही, असे निदान झाले. २१व्या आठवड्यातील सोनोग्राफीनंतर गर्भपात करणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, न्यायालयीन प्रक्रियेच्या धावपळीत २३वा आठवडा उजाडला.या अपवादात्मक प्रकरणाप्रमाणे भविष्यात अशा प्रकरणांसाठी महिलांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाणे टाळले पाहिजे. कारण यामुळे संबंधितांना मानसिक आणि शारीरिक तणाव उद्भवण्याची शक्यता अधिक असते. शिवाय, न्यायालयीन प्रक्रियेमुळे गर्भपाताच्या कालावधीत दिरंगाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकरणांसाठी विशेष वैद्यकीय समितीची नेमणूक करण्यात यावी.गर्भपाताच्या प्रकरणांविषयी योग्य मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यासाठी मूळ कायद्यात बदल केले पाहिजे. म्हणजेच, या विषयी स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनांनी पुढाकार घेऊन कायद्यात गर्भपाताच्या अपवादात्मक प्रकरणांविषयी विशेष तरतूद केली पाहिजे. भविष्यात येणाऱ्या प्रकरणांची वाट न पाहता संघटनेने पुढाकार घेतला पाहिजे. यामुळे भविष्यात विशिष्ट पातळीवर हा निर्णय होऊन अपवादात्मक परिस्थितीत गर्भपात करण्याची प्रक्रिया सोपी होईल.

(लेखक हे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत.)