शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सुमन कल्याणपूर यांना गदिमा पुरस्कार जाहीर

By admin | Updated: November 25, 2015 00:42 IST

साहित्य, चित्रपट आणि कलाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे.

पुणे : साहित्य, चित्रपट आणि कलाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे. गीतरामायणकार गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमांच्या ३८ व्या स्मृतीदिनानिमित्त १४ डिसेंबर रोजी या व इतर पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते होणार आहे. गदिमांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गेल्या दहा वर्षांपासून गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गृहिणी सखी सचिव’ पुरस्कार आंतरराष्ट्रीय किर्तीचे अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या पत्नी वसुंधरा जाधव यांना देण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून दिला जाणारा ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ भारतातील युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांना जाहीर झाला आहे. नव्या उभारीच्या प्रतिभावंतांना स्फूर्तीदायक ठरलेला चैैत्रबन पुरस्कार कथा, पटकथा, गीतकार आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना जाहीर झाला आहे. शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास दर वर्षी प्रतिष्ठानच्या वतीने अमरावती केंद्रांतर्गत अकोला जिल्ह्यातील बाल शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा मंगलसिंग पाकळ याला जाहीर झाला आहे. त्याने मराठी विषयात १०० पैैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. या कार्यक्रमानंतर स्वरानंद प्रतिष्ठान प्रस्तुत ‘रिमझिम स्वरांची’ हा सुमन कल्याणपूर यांनी पूर्वी ध्वनिमुद्रित केलेल्या गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. (प्रतिनिधी)सुमन कल्याणपूर यांचा जन्म १९४३ मध्ये बांगलादेशातील ढाका शहरात झाला. १९५४ मध्ये ‘दरवाजा’ या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला ख-या अर्थाने सुरुवात झाली. त्यांनी तब्बल ७४० हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. अजहू ना आए, मेरे संग गा, दिल ने फिर याद किया अशी त्यांनी गायलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्यांनी मराठी, गुजराती, कन्नड इत्यादी ९ भाषांमध्ये कल्याणपूर गायल्या आहेत. लिंबलोण उतरू कशी, दहावीस असती का रे, देव दया तुझी ही गाणीही लोकप्रिय ठरली आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे सुमन कल्याणपूर यांना २००९ मध्ये लता मंगेशकर सन्मानाने गौैरवण्यात आले.