शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२२ लाखाचा गुटखा जप्त, बुलढाण्याच्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 20:20 IST

 तालुक्यातील अंतुर्ली फाट्याजवळ एलसीबीच्या पथकाने शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास १६ लाखाचा गुटखा पकडला.

मुक्ताईनगर :    तालुक्यातील अंतुर्ली फाट्याजवळ एलसीबीच्या पथकाने शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास १६ लाखाचा गुटखा पकडला. याचबरोबर अवैधपणे वाहून नेणारी पाच लाखाची जीपही जप्त केली असून बुलढाणा जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.  स्थानिक गुन्हे शाखेच्या जळगाव विभागाला मुक्ताईनगर- बराणपुर रस्त्यावर सुगंधित तंबाखू व सुपारी तसेच गुटख्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. शुक्रवारी  रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी अंतुर्ली फाट्याजवळ पोलिसांनी  जिप गाडीची ( एमएच २८- बीबी ७५७) या गाडीची तपासणी केली असता यामध्ये विमल गुटखा व सुगंधित गुटका गोनपाटात आढळून आला. किरणकुमार बकाले यांच्या यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित दामोदरे, जितेंद्र पाटील, प्रीतम पाटील, दीपक पाटील, दीपक चौधरी, दीपक शिंदे  यांच्या पथकाने सापळा  रचला होता.सदरचा अवैध गुटखा हा माल १६ लाख २२ हजार ७२० रूपयांचा असून जीपची किंमत किंमत पाच लाख रुपये असून  असा एकूण २१ लाख २२ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी गोविंदा विश्वनाथ राऊत, गोविंदा सुभाष आखरे (रा. टुनकी तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा)  या दोघांना अटक केलेली असून दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. याप्रकरणी एलसीबीचे हवालदार अश्रफ शेख यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रbuldhanaबुलडाणा