शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

गुरू म्हणजे आर्ट आॅफ लाईफ

By admin | Updated: July 20, 2016 00:54 IST

गुरू नेहमी आपल्याला प्रेरणा देतात. गुरू कुंभाराप्रमाणे असतात. ते आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम करतात.

बिबवेवाडी : गुरू नेहमी आपल्याला प्रेरणा देतात. गुरू कुंभाराप्रमाणे असतात. ते आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम करतात. त्यांच्यामुळेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. गुरू म्हणजेच जीवनाचे शिल्पकार आणि आर्ट आॅफ लाईफ आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रसंत चंद्रप्रभसागर महाराज यांनी व्यक्त केले.जैन श्वेतांबर दादावाडी टेम्पल ट्रस्टच्या वतीने चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच मध्ये ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर राष्ट्रसंत ललितप्रभसागर उपस्थित होते. या वेळी प.पू. चंद्रप्रभ महाराज यांनी सांगितले, की प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी गुरू असतो. गुरूशिवाय जीवन जगणे अशक्य आहे. गुरूची आपण सेवा केली पाहिजे. गुरू हे कुंभाराप्रमाणे असतात एक बाजूने प्रेम करतात.परंतु, दुसऱ्या बाजूने शिस्त आणि संस्कारी बनविण्यासाठी तितकेच कठोर ही बनतात. गुरू अनेक शिष्य तयार करतात. मुलांचे लाड केले तर ते बिघडू शकतात. मुलांचे निर्माण फक्त प्रेमाने होत नाही, तर वेळप्रसंगी आई-वडिलांनी गुरूचीपण भूमिका निभावली पाहिजे.कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष भंवरलाल जैन, चातुर्मास समिती अध्यक्ष अशोक घीवाला, फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, राजेश सांकला, चंदुभाई शहा, तेजपाल गोटीवाला, मोहनलाल हंसाजी, अचल जैन, बाळासाहेब कटारिया, शरद शहा, भरत सुराणा, विमल संघवी, प्रवीण जैन, सतीश शहा, ललित गुंदेशा, अशोक हिंगड, यांच्यासह दादावाडी टेंपल ट्रस्टचे, चातुर्मास समितीचे सर्व पदाधिकारी, अनेक जैन मंडळे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.>प. पू. चंद्रप्रभसागर महाराजांनी सांगितले, की गुरू जीवनाचा रक्षणकर्ता असतो. संस्कारित मुले घडविण्यासाठी त्यांना गुरूचा सहवास मिळणे गरजेचे आहे. गुरू अनेकांच्या जीवनात परिवर्तन आणतात. शिष्य हा दगडासारखा असतो. गुरू त्याला शिक्षा, संस्कार, ज्ञान देऊन सभ्य आणि शालीन बनवतात. गुरू प्रत्येकाला जीवन कसे जगले पाहिजे, याची कला शिकवतात. समाज, परिवार आणि संसारामध्ये कशा प्रकारे वागले पाहिजे, याचे ज्ञान गुरू देतात. गुरूमुळे जीवनातील अंधार दूर होतो आणि आपले  जीवन समृद्ध बनते.