शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

"आता राज ठाकरे यांची सटकली का? हेच जर एकाद्या मुस्लीम व्यक्तीकडून घडलं असतं तर...!" गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 19:22 IST

गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, असे म्हणत, आता राज ठाकरे यांची सटकली का? असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला.  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९वा वर्धापन दिवस आज रविवारी पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या पाण्यासंदर्भात भाष्य केले. "बाळा नांदगावकर माझ्यासाठी गंगेचे पाणी घेऊन आले होते. पण, मी म्हणालो हड, मी नाही पिणार. पूर्वीच्या काळी ठीक होतं. आता सोशल मीडियावर बघितलं. लोक त्यात अंग घासून अंघोळ करताहेत. कोण पिणार ते पाणी? डोकी हलवा, जरा अंधश्रद्धेतून बाहेर या", असे म्हणत, राज ठाकरे यांनी गंगेतील दूषित पाण्यासंदर्भात भाष्य केले. यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, असे म्हणत, आता राज ठाकरे यांची सटकली का? असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला. काय म्हणाले सदावर्ते? -राज ठाकरे यांच्या विधानावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "मला असे वाटते की, आता राज ठाकरे यांना जहीर करावे लागेल की, त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी आहे की नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता त्यांन जाऊन विचारायला हवे, जे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर टीका करत असतात त्यांनी. त्यांनी आता स्वतःच विचार करायला हवा की, राज ठाकरे यांची भूमिका, आता कशा प्रकारची आहे? कारण राज ठाकरे यांना श्रद्धा हा भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार समजत नसेल, त्यातल्या त्यात, या देशात, या राज्यात, बहुसंख्य हिंदू आहेत आणि त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी संविधानाने संरक्षण दिले आहे. असे असताना, गंगा हा विषय एका अस्थेसोबत जोडला गेला आहे. त्या एकूण गंगांचाही त्यांनी अपमान केला आहे." सदावर्ते टीव्ही९ सोबत बोलत होते. 

"राज ठाकरे तीर्थ पिण्याची सक्ती नाही, पण..." -सदावर्ते पुढे म्हणाले, "याच बरोबर, बाळा नांदगावकर यांच्यासारख्या व्यक्तींने अत्यंत श्रद्धेने जर गंगा मातेचे तीर्थ आणलेले असेल आणि त्या तीर्थाची अवहेलना, त्या तीर्थाची हेटाळणी, स्वतःच्या आयुष्यातही केली, ठेवरे तिकडे, मी नाही पिणार म्हणून. राज ठाकरे पिण्याची सक्ती नाही. परंतु सार्वजनिक जीवनात कसे वागावे, कसे वर्तन करावे, इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, हे बघायला हवे."

"आता राज ठाकरे यांची सटकली का?" -"ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, हे लक्षात घ्यायला हवे राज ठाकरे," असेही सदावर्ते म्हणाले. तसेच, "आता राज ठाकरे यांची सटकली का?" असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेRaj Thackerayराज ठाकरे